कार रस्त्यात अचानक थांबल्यानं पुण्यात 2 बसची धडक, विचित्र अपघातानंतर प्रवाशांनी खाली उतरून चालकाला चोपलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
(अभिजीत पोते, प्रतिनिधी) पुणे - पुण्यातील वर्दळीच्या गांजवे चौकात एका कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे दोन मिनी बस एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला.
advertisement
1/7

पुण्यातील वर्दळीच्या गांजवे चौकात कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन मिनी बसचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/7
कार चालकाने भररस्त्यात अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या दोन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी कार चालकाला रस्त्यावरच चोप दिला.
advertisement
3/7
गांजवे चौकातून जात असताना एका कार चालकाने कोणतेही संकेत न देता अचानक आपली गाडी थांबवली. यामुळे कारच्या अगदी पाठीमागे असलेल्या मिनी बसच्या चालकाने जोरात ब्रेक लावला
advertisement
4/7
या बसच्या मागे असलेल्या दुसऱ्या मिनी बस चालकाला वेळ न मिळाल्याने त्याची बस समोरच्या बसवर जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
advertisement
5/7
अपघातात बसमधील काही प्रवाशांना दुखापत झाली, तर अनेक जण मोठ्या धक्क्याने घाबरले. अपघाताला कार कारणीभूत असल्याचे लक्षात येताच, बसमधील प्रवाशांनी खाली उतरून कार चालकाला जाब विचारला
advertisement
6/7
वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले आणि संतापलेल्या प्रवाशांनी कार चालकाला रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
7/7
या अपघातामुळे आणि त्यानंतर झालेल्या राड्यामुळे गांजवे चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
कार रस्त्यात अचानक थांबल्यानं पुण्यात 2 बसची धडक, विचित्र अपघातानंतर प्रवाशांनी खाली उतरून चालकाला चोपलं