TRENDING:

"ठाकरेंची शिवसेना मनसेच्या पाठित खंजीर खुपसेल", उदय सामंतांचा मोठा दावा, VIDEO

Politics

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या जागावाटपाची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी मनसे आणि शिवसेना (उबाठा) वर एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, " मनसेचं युबीटीचं तिकीट वाटप होईल, तेव्हा मनसेच्या पाठित युबीटी खंजीर खुपसेल.मनसेला हवे तिथे जागा देणार नाहीत.तेव्हा मनसेला पश्चाताप होईल."

Last Updated: Dec 28, 2025, 15:30 IST
Advertisement

मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई, मुंबईत जागांवरुन रस्सीखेच नाही... संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं, VIDEO

राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच, आता मुंबई महानगर पालिकेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचाच लक्ष आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युतीही पाहायला मिळत आहे. त्यातच आता त्यांच्या जागावाटपाचा तेढ नेमका काय आहे? यावर मोठी चर्चा होत आहे. तेव्हाच शिवसेना उबाठाचे खासदार ,संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं की,"जागांवरुन कोणतीही रस्सीखेच नाही. मुंबई पालिका निवडणुक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची,अस्मितेची लढाई आहे."

Last Updated: Dec 28, 2025, 16:27 IST

शिवसेना संपली की भाजपवाले मुंबई गिळायला मोकळे, उद्धव ठाकरेंचा घणाघात, VIDEO

मुंबईत शिवसेना भवनात उबाठाची बैठक झाली. तेव्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना विभाग प्रमुख,शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन केले आहे. तेव्हा ते म्हणाले,"भाजपने युतीच नाही तोडली तर,ते आता शिवसेना खतम करायला निघालेत. मुंबईत एकदा काय शिवसेना खतम झाली की ते मुंबई गीळायला मोकळे झाले.

Last Updated: Dec 28, 2025, 15:50 IST
Advertisement

"दीपक आबा पांढऱ्या पायाचा..." शहाजी बापूंचा सभेत बोचरा वार, Video

सांगोला नगरपालिकेत जिंकल्यानंतर विजयी सभेत नेते शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेले माजी आमदार दीपक साळूंखे आणि शेकापाचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि भाजपवर मिश्किल टीका केली आहे. ते म्हणाले, " दीपक आबा पांढऱ्या पायाचा, जिथं जातील तिथं पराभव होतो" अशी बोचरी टीका केली आहे.

Last Updated: Dec 28, 2025, 15:04 IST

अंधेरीत बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश,पोलिसांकडून छापेमारी,VIDEO

मुंबई येथील अंधेरी पश्चिम कपास परिसरात मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे भेसळयुक्त दूध डिटर्जंट पावडर,युरीया, रिफाईंड तेल वापरुन तयार करत होते.स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी या बनावट टोळीवर छापा टाकत हे प्रकरण उघडकीस आणले. वेगवेगळ्या नामांकीत ब्रँडच्या दुध कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये दूध भरताना एक इसम दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Last Updated: Dec 28, 2025, 14:41 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
"ठाकरेंची शिवसेना मनसेच्या पाठित खंजीर खुपसेल", उदय सामंतांचा मोठा दावा, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल