शॉकिंग! चिकन-मटण-मासे सोडाच... शुद्ध शाकाहारी अभिनेत्रीने खाल्ली मांजर, पुढे जे घडलं...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बॉलिवूडमधील या शुद्ध शाकाहारी असणाऱ्या अभिनेत्रीला फिल्मसाठी चक्क मांजर खावी लागली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल सविस्तर खुलासा केला आहे.
advertisement
1/9

मुंबई: आज आपण जिला 'द केरळ स्टोरी' मुळे एक जबरदस्त अभिनेत्री म्हणून ओळखतो, ती अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. निमित्त आहे तिच्या २००८ मधील गाजलेल्या '१९२०' या हॉरर चित्रपटाचं.
advertisement
2/9
या चित्रपटात अदाने एका भूताने पछाडलेल्या स्त्रीची भूमिका इतक्या जिवंतपणे साकारली होती की, आजही तो सिनेमा पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो.
advertisement
3/9
पण तुम्हाला तो सीन आठवतोय का? ज्यामध्ये भुताने पछाडलेली 'लिसा' एका कोपऱ्यात बसून चक्क एका मांजरीला कच्चं खात असते? हा सीन पाहून तेव्हा अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. पण खरं गुपित असं आहे की, अदा खऱ्या आयुष्यात शुद्ध शाकाहारी आहे. मग तिने हा सीन नक्की कसा शूट केला? याचा खुलासा स्वतः अदानेच केला आहे.
advertisement
4/9
एका मुलाखतीत अदाने यामागची रंजक आणि थोडीशी विचित्र गोष्ट सांगितली. ती म्हणाली, "ती मांजर अर्थातच खरी नव्हती. तो एक सॉफ्ट टॉय होता. पण तो सीन रिअल वाटावा म्हणून मेकर्सनी त्या खेळण्यातला कापूस काढून टाकला आणि त्यात असं मिश्रण भरलं जे पाहूनच कोणालाही उलटी येईल."
advertisement
5/9
मेकर्सनी त्या मांजरीच्या पोटात नसांसारखे वाटावेत म्हणून उकडलेले नूडल्स, रक्ताचा रंग येण्यासाठी सोया सॉस आणि टोमॅटो केचअप, घट्टपणा येण्यासाठी मिक्स फ्रूट जॅम आणि मनुके अशा गोष्टी भरल्या होत्या.
advertisement
6/9
अदा म्हणते, "तुम्ही कधी उकडलेले नूडल्स, सोया सॉस आणि जॅम एकत्र खाऊन पहा, ते इतकं भयानक लागतं की विचारू नका! पण मला तो सीन असा द्यायचा होता जणू मी जगातील सर्वात चविष्ट पदार्थ खात आहे."
advertisement
7/9
चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना तो सीन एकदम परफेक्ट हवा होता. त्यांनी अदाला स्पष्ट सांगितलं होतं की, "तू हे एखाद्या सुसंस्कृत मुलीसारखं खाऊ नकोस. तू भुताने पछाडलेली आहेस, त्यामुळे तुला ते ओरबाडून खायचं आहे आणि खाताना तो चपचप आवाजही आला पाहिजे."
advertisement
8/9
अदाने हे आव्हान स्वीकारलं आणि अत्यंत हिडीस वाटणारं ते मिश्रण चवीने खाण्याचं नाटक केलं. अदा सांगते की, हॉरर सिनेमाचं शूटिंग करताना असे सीन्स प्रत्यक्षात खूप मजेशीर किंवा कॉमेडी वाटतात, पण पडद्यावर जेव्हा साऊंड इफेक्ट्स आणि एडिटिंगसोबत ते येतात, तेव्हा लोक घाबरून ओरडतात.
advertisement
9/9
अदा शर्माला '१९२०' नंतर अनेक वर्ष मोठ्या हिटची प्रतीक्षा करावी लागली. पण, 'द केरळ स्टोरी'ने तिचं नशीब पूर्णपणे बदललं. असे असले, तरीही आजही तिची ओळख '१९२०' मधील त्या भयाण भूमिकेशिवाय पूर्ण होत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शॉकिंग! चिकन-मटण-मासे सोडाच... शुद्ध शाकाहारी अभिनेत्रीने खाल्ली मांजर, पुढे जे घडलं...