TRENDING:

पहिल्या पतीने केला शारीरिक छळ, दुसरा संसार 8 महिन्यात मोडला! नात्यांना वैतागलेल्या अभिनेत्रीने निवडला वेगळाच रस्ता

Last Updated:
ज्या वयात मुली आपल्या करिअरची स्वप्नं पाहतात, त्या वयात या अभिनेत्रीने संसाराचा उंबरठा ओलांडला, पण नशिबाने तिला सुखापेक्षा संघर्षाचीच जास्त चव चाखायला लावली.
advertisement
1/7
पहिल्या पतीने केला शारीरिक छळ, दुसरा संसार 8 महिन्यात मोडला!
मुंबई: इंडस्ट्रीमध्ये चमकणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही. कॅमेऱ्यासमोर 'ज्योती' किंवा 'वीरा' बनून जगाला आदर्श शिकवणारी अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या खऱ्या आयुष्याची कथा एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त नाट्यमय आणि वेदनादायी राहिली आहे.
advertisement
2/7
ज्या वयात मुली आपल्या करिअरची स्वप्नं पाहतात, त्या वयात स्नेहाने संसाराचा उंबरठा ओलांडला, पण नशिबाने तिला सुखापेक्षा संघर्षाचीच जास्त चव चाखायला लावली. दोन तुटलेली लग्नं आणि अनेक चर्चांनंतर आता स्नेहाने एक असा निर्णय घेतला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
advertisement
3/7
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्नेहाने आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेता अविष्कार दारव्हेकर याच्याशी तिने मोठ्या आशेने लग्न केलं. पण ज्या माणसावर विश्वास ठेवला, त्यानेच शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक खुलासा स्नेहाने 'बिग बॉस मराठी'च्या घरात केला होता. कोवळ्या वयात मिळालेली ही जखम इतकी खोल होती की, त्यातून सावरण्यासाठी तिला खूप वेळ लागला.
advertisement
4/7
पहिल्या लग्नाच्या धक्क्यातून सावरून स्नेहाने २०१५ मध्ये अनुराग सोळंकी याच्यासोबत पुन्हा एकदा संसाराचं स्वप्न पाहिलं. पण हे स्वप्नही विखुरलं. अवघ्या ८ महिन्यांतच त्यांचा संसार संपुष्टात आला. स्नेहासाठी नाती एक ट्रॉमा बनली होती. दोनदा संसार मोडल्यामुळे समाजाने तिच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले, पण तिने शांत राहणं पसंत केलं.
advertisement
5/7
यानंतरही वादांनी स्नेहाची पाठ सोडली नाही. 'चंद्रगुप्त मौर्य' मालिकेतील तिचा सहकलाकार आणि वयाने तिच्यापेक्षा ११-१२ वर्षांनी लहान असलेला फैजल खान याच्याशी तिचं नाव जोडलं गेलं. फैजलची एक्स गर्लफ्रेंड मुस्कान कटारिया हिने स्नेहावर गंभीर आरोप केले होते. स्नेहा आणि फैजलने या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी या प्रकरणाने स्नेहाला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ओढलं होतं.
advertisement
6/7
इतक्या उलथापालथीनंतर स्नेहा आता पूर्णपणे बदलली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "नाती आता माझ्यासाठी भीतीदायक झाली आहेत. पण मला आता एकटेपणा वाटत नाही. मी स्वतःच्या जगात आनंदी आहे."
advertisement
7/7
स्नेहाचा सोशल मीडिया पाहिला, तर ती आता आध्यात्माकडे वळल्याचं स्पष्ट दिसतंय. कधी वृंदावनच्या कुंजगल्लीत फिरताना तर कधी कृष्णभक्तीत तल्लीन झालेले तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या पतीने केला शारीरिक छळ, दुसरा संसार 8 महिन्यात मोडला! नात्यांना वैतागलेल्या अभिनेत्रीने निवडला वेगळाच रस्ता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल