Weather Alert: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय हिम वादळ; हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात डिसेंबरअखेर थंडीचा कडाका वाढला आहे. 29 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

राज्यात थंडीचा प्रभाव अद्याप कायम असून किमान तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत सकाळच्या वेळी गारठा अधिक जाणवत असून काही भागांत तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. निफाड, धुळे, अहिल्यानगर आणि परभणी या भागांत किमान तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात आलं आहे. 29 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांतील हवामान स्थिती कशी राहील? पाहुयात.
advertisement
2/7
मुंबईत हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे. 29 डिसेंबर रोजी शहरात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. दिवसभर निरभ्र आकाश राहील, तर सकाळी आणि रात्री सौम्य गारवा जाणवेल.पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव टिकून आहे.
advertisement
3/7
पुणे शहरात 29 डिसेंबर रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. सकाळच्या सुमारास धुक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातही थंडीचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 29 डिसेंबर रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. पहाटे थंड वातावरण राहील, तर दिवसभर आकाश निरभ्र असण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक तीव्र आहे. नाशिकमध्ये 29 डिसेंबर रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. निफाड आणि धुळे परिसरात तापमान 10 अंशांच्या खाली घसरल्याने सकाळच्या वेळी गारवा अधिक जाणवत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही थंडी कायम आहे.
advertisement
6/7
विदर्भातही थंडीचा प्रभाव कमी झालेला नाही. नागपूर येथे 29 डिसेंबर रोजी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. येथे आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार आहे.
advertisement
7/7
राज्यातील अनेक भागांत किमान तापमान कमी जास्त होत असल्याने थंडीचा प्रभाव देखील कमी जास्त होत आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरणे, सकाळी व रात्री अनावश्यक बाहेर पडणे टाळणे, तसेच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय हिम वादळ; हवामान विभागाचा अलर्ट