मिरा-भाईंदरमध्ये आयोजित सनातन धर्मसभा या प्रवचन कार्यक्रमात जैन मुनी निलेशचंद्र बोलत होते. हा कार्यक्रम शिवसेना (शिंदे गट) समर्थित सामाजिक संस्थेमार्फत आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
'महाराष्ट्रात मराठीचा आम्ही सन्मान करतो, तसेच महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही आदर करतो. मात्र हा महाराष्ट्र कोणाच्या एकाच्या बापाचा नाही. भाषेच्या नावावर जर मारवाडी किंवा अमराठी बांधवाला हात लावला, तर सहन केलं जाणार नाही आणि जशास तसं उत्तर देऊ अशा इशारा जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिला.
advertisement
ज्याच्यावर हल्ला झाला,तोच नंतर हल्लेखोरांना बुके देतो. त्याच्या पाठीशी ना आमदार आहे, ना खासदार, ना नगरसेवक. त्या जागी मी असतो, तर मारहाण करणाऱ्याला गाडल्याशिवाय राहिलो नसतो,असे वादग्रस्त विधान जैन मुनी निलेशचंद्र यांनी यावेळी केले होते.
तसेच, राजस्थानी, जैन आणि मारवाडी समाजाने संघटित होण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर त्यांनी नाव न घेता भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि माजी आमदार गीता जैन यांच्यावरही टीका केली. ती कसली शेरनी तिने टी राजाचा कार्यक्रम हायजॅक केला असा आरोप जैन मुनींनी केला आहे.
नुकत्याच झालेल्या संकल्प सभेत मिरा-भाईंदरला एकत्र जोडण्याचे, सनातन धर्म आणि विविध समाजांना एकत्र आणण्याचे काम अपेक्षित होते. मात्र काही नेत्यांचा अहंकार आड येत आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तुम्हाला बाबर कशाला पाहिजे जर तुम्हाला बाबर पाहिजे असेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पैदा करू.जैन मंदिर सुरक्षित आहेत.मग हिंदू मंदिर सुरक्षित का नाहीत? या मिरा भाईंदरमध्ये याच्यासाठी आलो आहे मी,
जेवढे आमचे राजस्थान छत्तीस कोम आहेत त्यांना ते लोक म्हणतात, तूम एक होगे तो भी तुमको मारेंगे, मारेंगे हम भी है आप भी है.जशा निवडणूक येतात तेव्हा त्यांना हिंदुत्व आठवतं.ज्यावेळी मिरा रोडमध्ये मिठाईवाल्याला मारहाण झाली त्यावेळी विक्रम प्रताप सिंग आणि परिवार मंत्री प्रताप सरनाईक आले होते.बाकी कोणतेही नेते आले नाही,अशा शब्दात त्यांनी नाव न घेता माजी आमदार गीता जैन यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी आमचं कोणतही वैर नाही.त्यांच्यामध्ये काही गद्दार नेते आहेत.राजस्थान 36 कोमचा आमदार मेहता यांच्यावरील विश्वास उडाला आहे. मीरा भाईंदर मधील सर्व जण का बरं एकनाथ शिंदे कडे आले? असा सवाल जैन मुनींनी उपस्थित केला आहे.
मनसेची जैन मुनींवर टीका
जैन मुनींच्या या वादग्रस्त विधानाचा मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी खरपूस समाचार घेतला असून जैन मुनींनी कोणीतरी दिलेली स्क्रिप्ट वाचून राजकारण करू नये.नरेंद्र मेहता प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे आम्ही सगळे एकच आहोत आम्ही बघून घेऊ. नया नगर भेंडी बाजार मध्ये मनसेने जाऊन दाखवावं यावर राणे यांनी मी रोज टिक्का लावून नया नगर मध्ये जातो.. या देशामध्ये मराठीचा अस्तित्व टिकलं पाहिजे.. जर मराठी हिताच्या कोणी आड आलं तर त्याला जस च्या तस उत्तर दिलं जाईल
मराठी एकीकरणाचा जैन मुनींना इशारा
मिरा रोड इथे उत्तरेच्या संस्कृती संबधित धार्मिक कार्यक्रमात धर्माच्या नावाखाली मराठी द्वेष करून भाषिक वाद वाढविणाऱ्या जैन मुनींना मराठी एकीकरण समितीचा इशारा, मुनींच्या वादग्रस्त वक्तव्यावर समिती आक्रमक.. स्थानिक राजकीय लोकांनी अशा लोकांना कार्यक्रमात वाद वाढवायला बोलावले होते का असा प्रश्न विचारला आहे.. महाराष्ट्रात राहता तर भाषा बोललेच पाहिजे माज केला तर तसेच उत्तर त्यापद्धतीने उत्तर दिले जाईल.
