वाणेगाव येथे प्रभाकर जाधव यांची वडिलोपार्जित मका आणि कापसाची शेती होती. मात्र काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने त्यांनी गेल्या 23 वर्षांपासून झेंडू शेतीला सुरुवात केली. यंदा देखील 25 ऑगस्ट रोजी झेंडूची लागवड केली, मल्चिंगवर बेड पद्धतीने झेंडूची लागवड करण्यात आली आहे. चार बाय एक फुटावर या झेंडू झाडांची लागवड जाधव यांनी केली आहे. तसेच या शेतीसाठी ट्रीप द्वारे पाण्याचे व्यवस्थापन केलेले आहे. तसेच तापमान वाढल्यास फोबरने वरतून पाणी दिले की ते तापमान स्थिर व झाडांना पोषक ठेवते. याबरोबरच गतवर्षी 35 टनापर्यंत झेंडूचे उत्पादन निघाले होते असे प्रभाकर जाधव यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
झेंडू शेतीतील यंदा सध्या चौथा तोडा सुरू आहे, आतापर्यंत पंधरा क्विंटल फुलं निघाले आहे. या तोड्यातील 10 क्विंटल झेंडू नागपूरसाठी काढला असून तो 50 रुपये किलोने जागेवरून पार्सल देखील केला आहे. झेंडू टिकून ठेवण्यासाठी चांगले उत्पादन मिळवण्यासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशक होळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरावी लागते. लागवड केल्यानंतर त्या वेळेला 3 फवारण्या केल्या होत्या, पहिल्या वेळेस मायको दुसऱ्या वेळेस 13-40-13 आणि तिसरी 12-61 या औषधांच्या फवारण्या केल्या आहे, झेंडू फुल शेती फायदेशीर आहे, तसेच तरुणांनी या शेतीमध्ये उतरायला हवे, असे देखील जाधव यांनी म्हटले आहे.