TRENDING:

नोरा फतेहीचं ठरलं? 2026 मध्ये चढणार बोहोल्यावर, 'त्या' करोडपती व्यक्तीसाठी पोहोचली सातासमुद्रापार, कोण आहे तो?

Last Updated:
Nora Fatehi Boyfriend: धमाकेदार डान्स स्टेप्स आणि जबरदस्त स्टाईलमुळे चाहत्यांना घायाळ करणारी नोरा सध्या तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आली आहे.
advertisement
1/8
नोरा फतेहीचं ठरलं? 2026 मध्ये चढणार बोहोल्यावर, कोण आहे तो करोडपती?
मुंबई: बॉलिवूडची 'दिलबर' गर्ल नोरा फतेही म्हटलं की डोळ्यांसमोर येतात तिचे घायाळ करणारे डान्स स्टेप्स आणि जबरदस्त स्टाईल. पण सध्या नोरा डान्समुळे नाही, तर तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आली आहे.
advertisement
2/8
चर्चा अशी आहे की, नोराच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून ती चक्क एका फुटबॉलपटूच्या प्रेमात पडली आहे. इतकंच नाही, तर आपल्या या लाडक्या खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी ती सध्या सातासमुद्रापार मोरोक्कोमध्ये पोहोचली आहे.
advertisement
3/8
सोशल मीडियावर अशा चर्चांना उधाण आलंय की, नोरा तिथे फक्त प्रेक्षक म्हणून गेलेली नाही. गेल्या काही दिवसांत दुबई आणि मोरोक्कोमध्ये नोरा एका प्रसिद्ध फुटबॉलपटू सोबत वारंवार दिसून आली आहे.
advertisement
4/8
ही सिक्रेट डेटिंग आता चाहत्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. नोरा नेहमीच तिचं खाजगी आयुष्य गुलदस्त्यात ठेवते, पण फुटबॉलच्या मैदानातून येणाऱ्या या बातम्यांमुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
5/8
एकीकडे प्रेमाच्या चर्चा रंगत असतानाच, दुसरीकडे नोरा एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावली आहे. नुकताच सनबर्न फेस्टिव्हल २०२५ दरम्यान नोराच्या गाडीला एका मद्यधुंद चालकाने जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की नोराच्या गाडीचे नुकसान झाले आणि ती स्वतः गाडीत एका बाजूला फेकली गेली.
advertisement
6/8
या घटनेचा थरार सांगताना नोरा म्हणाली, "एका दारू प्यायलेल्या ड्रायव्हरने आमच्या गाडीला इतकी जोरात धडक दिली की मी दुसऱ्या बाजूला फेकली गेले. माझं डोकं जोरात खिडकीवर आदळलं. क्षणभर काय झालं तेच कळलं नाही."
advertisement
7/8
सुदैवाने, नोराला फक्त किरकोळ जखमा झाल्या असून ती आता सुरक्षित आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मद्यधुंद चालकांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
8/8
फुटबॉलपटूसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नोराने अद्याप अधिकृत मोहर उमटवली नसली, तरी तिच्या मोरोक्को भेटीने बरंच काही स्पष्ट केलं आहे. तिच्या चाहत्यांची आता एकच इच्छा आहे की, नोराने लवकरच तिच्या मिस्टर राईटचा चेहरा जगासमोर आणावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नोरा फतेहीचं ठरलं? 2026 मध्ये चढणार बोहोल्यावर, 'त्या' करोडपती व्यक्तीसाठी पोहोचली सातासमुद्रापार, कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल