
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथे एका शेतकऱ्याने बिबट्यापासून सुरक्षा मिळावी म्हणून एक गावठी जुगाड केला आहे. या जुगाडाची चर्चा महाराष्ट्रभर आहे. त्याने एक ध्वनी यंत्र तयार केले आहे. त्यात त्याने बॉटल,नटबोल्टचा वापर केला आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 18:31 ISTवाघांचं आश्रय स्थान असलेलं बोर व्याघ्र जंगल सध्या वेगवेगळ्या वन्यप्राण्यांनी फुलले आहे. त्यामुळे पर्यटकांची ओढ याठिकाणी वाढली आहे. आता तेथे वाघ जास्त प्रमाणात दिसत आहेत.
Last Updated: Dec 28, 2025, 20:22 ISTराज्यात महापालिकेच्या निवडणुकीमुळे पक्षांची युती आणि जागावाटप हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आज काँग्रेस आणि वंचितची युती झाली आहे. त्यामुळे आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला चिमटा काढला आहे. ते म्हणाले," प्रकाश आंबेडकरांनी युती मान्य केली आहे का? युती मनापासून स्वीकारली आहे का? प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद काँग्रेसला मिळाली तर आनंदच आहे."
Last Updated: Dec 28, 2025, 20:07 ISTबदलापुरात वामन म्हात्रे फाऊंडेशन मार्फत आग्री महोत्सवात गौतमी पाटीलचा डान्स बदलापूरकरांना पाहायला मिळाला. तेव्हा तिला पालिका निवडणुकीबद्दल विचारले गेले. तेव्हा ती निवडणुकीवर प्रतिक्रिया देत म्हणाली," मी फक्त डान्स करणार, अॅक्टींग करणार.राजकारणात मला काहीही इंट्रेस्ट नाही."
Last Updated: Dec 28, 2025, 18:04 ISTअहिल्यानगरमध्ये शिर्डी साईमंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. नवे वर्ष सुरु होणार आहे. तसेच पर्यटन सुरु झाले आहे. त्यामुळे या मंदिरात खूपच भक्तांची गर्दी झाली.चक्क देशविदेशातून भक्त साईचरणी लीन झाले आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरला साईमंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 17:45 IST