जगातील 3 ठिकाणं, जिथं जाण्यास मनाई; एक तर भारतातच, इथं चुकूनही गेलात तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
3 Places Entry Banned : भारतातील एक ठिकाण पकडून जगातील अशी 3 ठिकाणं तर जिथं तुम्ही जाल पण जिवंत परत याल याची हमी नाही, असं इथं काय आहे?
advertisement
1/5

थर्टी फर्स्ट पार्टी, न्यू इअर सेलिब्रेशन म्हणून अनेकांनी कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन केला आहे. पण काही ठिकाण अशी आहेत जिथं जायला परवानगी नाही. जगात अशी 3 ठिकाणं आहेत, त्यापैकी एक भारतात आहे. इथं चुकूनही गेलातर तर तुमचं काही घरं नाही. आता ही ठिकाणं कोणती ते पाहुयात.
advertisement
2/5
एरिया 51 : हे अमेरिकेतील नेवाडा इथं आहे. जरी ते अनेकदा लष्करी तळ असल्याचं सांगितलं जात असलं तरी ते एक अत्यंत गुप्त ठिकाण आहे. बरेच लोक असा दावा करतात की इथं एलियन्स येतात. अमेरिका आणि एलियन्समध्ये संपर्क झाला आहे, पण अमेरिका हे लपवत आहे. एलियन्सशी संबंधित सर्व प्रकल्प या ठिकाणापासून सुरू होतात. याचे एक कारण आहे. जवळपासच्या रहिवाशांनी या भागात अनेक वेळा UFO पाहिल्याचा दावा केला आहे. पण अमेरिका हे नाकारते. लष्करी गुपित्यांमुळे हे ठिकाण बाहेरील लोकांसाठी बंद असल्याचा त्यांचा दावा आहे.
advertisement
3/5
स्नेक आयलंड : ब्राझीलमधील या बेटावर अनेक धोकादायक साप राहतात. त्यामुळे जर तुम्ही तिथं जाण्याची चूक केली तर सापाचं विष तुम्हाला मारू शकतं. त्यामुळे लोकांना या बेटापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे बेट अशा सापांचं घर आहे ज्यांच्या विषाचा एक थेंबही मारण्यासाठी पुरेसा आहे. म्हणूनच लोक तिथं जाण्यास घाबरतात. तर काही लोक बेकायदेशीरपणे प्रवेश करतात. हे लोक या सापांची आणि त्यांच्या विषाची तस्करी करतात.
advertisement
4/5
नॉर्थ सेंटिनेल बेट : हे भारतातील अंदमान आणि निकोबार बेटांचा भाग आहे. या बेटाला भेट देण्यास मनाई आहे. 2001 च्या जनगणनेनुसार या बेटावर फक्त 40 लोक राहतात. त्यांना बाहेरील लोकांना आवडत नाहीत. जे पर्यटक तिथे जाण्याचं धाडस करतात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा होते. एका माणसाने तिथं ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
advertisement
5/5
ही जगातील 3 खतरनाक ठिकाणं आहे जिथं जायलाच परवानगी नाही. पण अशी आणखी काही डेंजर ठिकाणं तुम्हाला माहिती आहेत का? तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जगातील 3 ठिकाणं, जिथं जाण्यास मनाई; एक तर भारतातच, इथं चुकूनही गेलात तर...