'जुदाई' फिल्मसारखा पत्नीने पतीचा केला सौदा! बायकोने गर्लफ्रेंडला दीड कोटीला विकला नवरा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wife Sold Husband To Girlfriend : जुदाई फिल्म तुम्ही पाहिलीच असेल, ही रिल स्टोरी रिअलमध्येही घडली आहे. जिथं काही पैशांसाठी एका पत्नीने आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडला विकलं आहे.
advertisement
1/5

अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांची जुदाई फिल्म तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच आहे. ज्यामध्ये काजल तिचा नवरा राजला जान्हवीला कोट्यवधी रुपयांसाठी विकते. ही फिल्म पाहिल्यावर अनेकांना हे फक्त फिल्ममध्येच होऊ शकतं असं वाटतं. प्रत्यक्षात कोणतीच पत्नी आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहू शकत नाही, अगदी पैशांसाठीही नाही. असं वाटतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल जुदाई फिल्मसारखीच रिअल स्टोरी घडली आहे. एका महिलेने पैशांसाठी आपल्या नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडला विकलं आहे.
advertisement
2/5
मध्य प्रदेशच्या भोपाळमधील हे अजब प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. केंद्र सरकारच्या एका विभागात काम करणारी 42 वर्षांची महिला तिच्याच ऑफिसमधील 54 वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडली. दोघांच्याही वयात 10 वर्षांचं अंतर. त्या पुरुषाचं लग्न झालेलं, त्याला एक 16 वर्षांचा मुलगा आणि दोन 12 वर्षांच्या मुली.
advertisement
3/5
पुरुष आणि महिलेची जवळीक वाढली. पती आपल्या पत्नीपासून दूर राहू लागला. ज्यामुळे कुटुंबात दररोज भांडणं होऊ लागली, याचा परिणाम मुलांवरही होऊ लागली. शेवटी एका मुलीने फॅमिली कोर्टात तक्रार दाखल केली तेव्हा न्यायालयाने पालकांना समुपदेशनासाठी बोलावलं. (AI Generated Photo)
advertisement
4/5
समुपदेशनादरम्यान पतीने सांगितलं की, त्याचं त्याच्या मुलांवर खूप प्रेम आहे, पण त्याला त्याच्या पत्नीसोबत राहायचं नाही. त्याची पत्नी त्याच्याशी दररोज भांडते, त्याला आता घरी जायचं नाही. त्याला त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहायचं आहे. समुपदेशकांनाही या कपलमध्ये समेट घडवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. (AI Generated Photo)
advertisement
5/5
पुरुषाच्या पत्नीने सांगितलं की तिला तिच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं आहे. तिच्या मुली आणि स्वतःच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून तिने एक डुप्लेक्स फ्लॅट आणि 27 लाख रुपये रोख रक्कम मागितली. तिच्या पतीच्या गर्लफ्रेंडने तिची ऑफर स्वीकारली. तिने तिला फ्लॅट आणि पैसे देऊन करार पूर्ण केला. (AI Generated Photo)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'जुदाई' फिल्मसारखा पत्नीने पतीचा केला सौदा! बायकोने गर्लफ्रेंडला दीड कोटीला विकला नवरा