TRENDING:

पुण्याच्या गुडलक चौकात कायतरी घडतंय? कलाकारांच्या विरोधानं वातावरण तापलं, Video

Last Updated:

Pune News: पुण्यातील गुडलक चौकाची एक वेगळी ओळख निर्माण केलेला कलाकार कट्टा हटवण्याबाबत चर्चा सुरू आहे. यावरून आता वातावरण तापलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहरातील गुडलक चौकाची एक वेगळी ओळख निर्माण केलेला कलाकार कट्टा हटवण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार करून हा कट्टा हटवावा, असे निवेदन पालिका आयुक्तांकडे दिल्याचे समोर आले आहे. मात्र या निर्णयाला कलाकारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

सदर कलाकार कट्टा हा रस्त्याच्या मधोमध नसून फुटपाथच्या एका कोपऱ्यात उभारण्यात आला आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतच तो उभारण्यात आल्याचा कलाकारांचा दावा आहे. या ठिकाणी चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार तसेच विविध कला सादर करणारे तरुण कलाकार आपली कला सादर करतात. शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी कलाकारांना मिळते.

advertisement

Baramati: ‘त्या’ 30 मार्कांची धमकी! विद्यार्थिनीला नको ते मेसेज, प्राध्यापकाच्या कृत्यानं बारामतीत संताप

वाहतूक कोंडीचे कारण देत कट्टा स्थलांतरित करण्याची मागणी केली असली, तरी खंडोजी बाबा चौक, गोखले चौक, डेक्कन जिमखाना कॉलनी, बीएमसीसी रस्ता परिसरात वाहतूक कोंडीची समस्या अनेक वर्षांपासून असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. कलाकार कट्टा उभारण्यापूर्वीही येथे वाहतुकीची समस्या होती आणि स्थलांतर केल्याने ती सुटेलच असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

दररोज सुमारे 9 ते 10 कलाकार येथे आपली कला सादर करतात. विशेषतः फर्ग्युसन कॉलेज परिसरातील विद्यार्थी येथे येऊन आपली कला सादर करतात. अनेक विद्यार्थ्यांकडे आर्थिक साधनांची कमतरता असली तरी त्यांच्याकडे कला आहे. या कट्ट्यामुळे त्यांना थोडाफार आर्थिक आधार मिळतो, असे कलाकारांनी सांगितले.

गेल्या चाळीस वर्षांपासून कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराने सांगितले की, 1998 पासून ते या चौकात बसून कला सादर करत आहेत. त्या वेळी कलाकार कट्टा नव्हता मात्र सातत्याने कला सादर करून त्यांनी लोकांपर्यंत पोहोच साधली. नागरिकांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले असून आजही ते परंपरा जपत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, 10 गुंठ्यात केली लसणाची लागवड, दीड लाखांचा मिळाला नफा
सर्व पहा

तक्रार करणाऱ्यांना प्रत्यक्षात किती अडचण होते, याची वस्तुनिष्ठ तपासणी करावी, अशी मागणी कलाकारांनी केली आहे. पुणे हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. अशा शहरात कलाकारांसाठी उभ्या राहिलेल्या सकारात्मक उपक्रमाला हटवण्याऐवजी वाहतूक समस्येवर शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कलाकार आणि नागरिकांकडून होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या गुडलक चौकात कायतरी घडतंय? कलाकारांच्या विरोधानं वातावरण तापलं, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल