Baramati: ‘त्या’ 30 मार्कांची धमकी! विद्यार्थिनीला नको ते मेसेज, प्राध्यापकाच्या कृत्यानं बारामतीत संताप
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Baramati News: वर्गात शिकवताना प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींना स्पर्श करणे, त्यांच्याशी जवळीक साधण्याचे संतापजनक प्रकार होत होते, असा आरोप केला जात आहे.
पुणे: बारामती तालुक्यातून शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील माळेगाव येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित प्राध्यापकाविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर माळेगाव शहरासह बारामती तालुक्यात खळबळ उडाली असून पालकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना
या प्रकरणी आरोपी प्राध्यापकाचे नाव नितीन शंकर तावरे असे असून, त्यांच्याविरोधात संदीप रमेश शहा यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिच्या संमतीशिवाय व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच मेसेजला उत्तर न दिल्यास अंतर्गत परीक्षेतील 30 गुण आपल्या हातात असल्याचे सांगून दबाव टाकल्याचा आरोप आहे.
advertisement
वर्गात शिकवताना आरोपीकडून विद्यार्थिनींना स्पर्श करणे, त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे असे संतापजनक प्रकार घडत होते. मुलींनी विरोध केला तर त्यांना वर्गात अपमानित केले जात होते. हा सर्व प्रकार 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2026 दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 12:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Baramati: ‘त्या’ 30 मार्कांची धमकी! विद्यार्थिनीला नको ते मेसेज, प्राध्यापकाच्या कृत्यानं बारामतीत संताप








