VIDEO: बारामतीत अजितदादांचा पुतळा उभारला जाणार, ठिकाण कुठे अन् कशी असेल संरचना? पाहा पहिली झलक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आता बारामतीत अजित पवारांचा पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी निधन झालं. ते मुंबईहून बारामतीच्या दिशेनं खासगी विमानाने येत होते. मात्र लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. आता बारामतीत अजित पवारांचा पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांचा पुतळा कुठे उभारला जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील तिरंगा चौकात अजित पवारांचा पुतळा बसवला जाणार आहे. या पुतळ्याची एकूण उंची १५ फूट इतकी असणार आहे. हा पुतळा ब्राँझ धातूचा असणार आहे. सध्या या पुतळ्याची निर्मिती सुरू असून याची पहिली झलक समोर आली आहे. हा पुतळा नेमका कसा असेल? याचा व्हिडीओही आता न्यूज १८ मराठीकडे आला आहे.
advertisement
अजित पवारांचा हा पुतळा उभारलेल्या अवस्थेत असेल. याची उंची १० फूट असणार आहे. तर हा पुतळा उभारण्यासाठी जो चौथरा बांधला जाणार आहे, त्याची उंची पाच फूट असणार आहे. म्हणजेच या पुतळ्याची एकूण उंची १५ फूट इतकी असणार आहे. या पुतळ्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात लाडकी बहीण योजनेदरम्यान अजित पवारांचं फेमस झालेलं जॅकेटही परिधान केल्याचं दिसत आहे.
advertisement
बारामतीत अजित पवारांचा उभारला जाणार पुतळा, पाहा पहिली झलक pic.twitter.com/AEB0R7g0sY
— News18 Marathi (@News18_marathi) February 16, 2026

विशेष म्हणजे बारामतीच्या तिरंगा चौकात अजित पवारांचा केवळ पुतळाच उभारला जाणार नाही, तर या पुतळ्यासोबतच नटराज नाट्य कलादालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे म्युझियम देखील तयार केलं जाणार आहे. नटराज कला दालनाचे प्रमुख किरण गुजर यांनी याबाबतची माहिी दिली आहे. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात 22 जुलैला 'अजित महोत्सव' देखील भरवला जाणार आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 12:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO: बारामतीत अजितदादांचा पुतळा उभारला जाणार, ठिकाण कुठे अन् कशी असेल संरचना? पाहा पहिली झलक








