मुंबईकरांनो उद्या लवकर निघा, परदेशी पाहण्यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
Last Updated:
Mumbai traffic update : मुंबई शहरात उद्या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आलेला आहे. नेमका हा बदल कोणत्या मार्गावर असेल ते जाणून घ्या.
मुंबई : मुंबईकरांनो लक्ष द्या तुमच्या अत्यंत कामाची बातमी समोर आलेली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईत मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत
गेटवे ऑफ इंडिया येथे इंडिया-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासातर्फे 14 ते 22 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. तसेच ताज महाल प्लॅलेस येथे इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम पार पडणार आहे.
या फोरममध्ये उद्योगपती, स्टार्टअप उद्योजक, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत गेटवे ऑफ इंडिया परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असून काही रस्ते सर्वसामान्य वाहनांसाठी बंद राहतील.
advertisement
'हे' रस्ते वाहतूकीसाठी बंद
छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील रिगल जंक्शन ते गेटवे ऑफ इंडिया, ॲडम स्ट्रीट, पी. रामचंदानी मार्ग आणि जोकिम अल्वा चौकदरम्यान वाहतूक बंद राहील तसेच पी. रामचंदानी मार्गावर काही ठिकाणी प्रवेश रोखण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना सूट असेल.
जाणून घ्या पर्यायी मार्ग
रिगल जंक्शनकडून शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण मार्ग आणि बी. के. बोमण बेहराम मार्गाने पर्यायी मार्ग उपलब्ध असेल. रेडिओ क्लबकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या वाहनांसाठीही वेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
advertisement
नो-पार्किंग झोन
नाथालाल पारेख मार्ग, जगन्नाथ भोसले मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगांवकर मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्गावर नो-पार्किंग लागू असेल आणि मुंबई पोलिसांनी नागरिकांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 12:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांनो उद्या लवकर निघा, परदेशी पाहण्यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग








