advertisement

Weight Management : वजन कमी करण्यात काय चुका होतात ? समजून घेऊया शरीरात होणाऱ्या गोष्टींचा कसा होतो परिणाम

Last Updated:

वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ कमी खाणं, जिम आणि डाएटला जाणं असे उपाय केले जातात पण वजन कमी होत नाही. यामागे काय कारणं असू शकतात समजून घेऊयात.

News18
News18
मुंबई : वाढलेलं वजन कमी करण्याठी अनेक उपाय आहेत. जिम आणि डाएटिंग केल्यानंतरही वजन कमी होत नाही.
वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ कमी खाणं, जिम आणि डाएटला जाणं असे उपाय केले जातात पण वजन कमी होत नाही. यामागे काय कारणं असू शकतात समजून घेऊयात. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ आणि वेलनेस कोच सिमरत कथुरिया यांनी याविषयी माहिती दिली आहे.
advertisement
शरीरात पाणी साचणं - शरीरात पाणी साचण्यामुळे, अंगावर सूज येते. मुख्यत्वे हात, पाय, घोटा, पोटावर सूज येते. शरीराच्या ऊतींमधे सामान्य पातळीपेक्षा जास्त द्रव जमा होतो तेव्हा असा परिणाम दिसून येतो. वजन कमी करण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं. अनेकदा सूज आल्यामुळे वजन नेमकं किती कमी झालं ते समजत नाही. पाणी साचल्यामुळे वाढलेलं वजन तात्पुरत्या स्वरुपाचं असू शकतं.
advertisement
झोपेचा अभाव - झोपेचा अभाव हे वजन कमी न होण्याचं एक प्रमुख कारण आहे. चांगलं आरोग्य राखण्यासाठी सात-आठ तासांची झोप आवश्यक आहे. संप्रेरकांचं संतुलन होण्यासाठी व्यवस्थित झोप होणं आवश्यक आहे.
खाण्याच्या सवयी - रात्री उशिरा खाणं आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन झपाट्यानं वाढतं. जिमला जातो म्हणून काहीही खाल्लं तरी चालतं असं अनेकांंना वाटतं पण चुकीच्या आहारानं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात.
advertisement
बद्धकोष्ठता - बद्धकोष्ठता हे वजन न कमी होण्याचं एक कारण आहे. शरीराबाहेर पडणारे पदार्थ शरीरातच राहिल्यानं, योग्य निचरा न झाल्यानं वजन तात्पुरतं वाढलेलं दिसतं.
व्यायाम - झोपेचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कॅलरीज बर्न करण्यासाठी नियमित 45 मिनिटांचा व्यायाम करणं आवश्यक आहे.
advertisement
हार्मोनल असंतुलन - वजन वाढणं आणि कमी होणं यासाठी संप्रेरकांचं संतुलन महत्त्वाचं असतं. पण ताणतणाव आणि कमी प्रथिनं यामुळे वजन कमी करण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अचानक बदल करण्यापेक्षा या सगळ्या बाबींचा विचार करणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Management : वजन कमी करण्यात काय चुका होतात ? समजून घेऊया शरीरात होणाऱ्या गोष्टींचा कसा होतो परिणाम
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement