5 हजार मजुरांची दिवाळी झाली गोड, पुण्यातील 'महा एनजीओ'चा अनोखा उपक्रम
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महा एनजीओ फेडरेशन पुण्यातील 50 एनजीओना सोबत घेऊन ही आत्मनिर्भर दिवाळी साजरी करत आहे.
advertisement
1/7

सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. परंतु, मतिमंद विद्यार्थी, दिव्यांग, अंध आणि एचआयव्ही बाधित, वृद्धाश्रम, बांधकाम मजूर, अपंग वृध्द, भटक्या, आदिवासी समाजातील गोरगरीब कुटुंब आणि रेड लाईट एरिया मधील महिला, अनाथाश्रमातील गरजूंची दिवाळी आनंददायी करण्यासाठी पुण्यातील एनजीओ एकत्र आल्या आहेत.
advertisement
2/7
बिगारी काम करणारे मजूर हे पुणे तसेच राज्याबाहेरून येऊन काम करतात. कामाअभावी त्यांची व कुटुंबाची कित्येक महिने भेट होत नाही. त्यांची दिवाळी आनंदी करण्याचा छोटासा प्रयत्न महा एनजीओ फेडरेशन करत आहे.
advertisement
3/7
आत्मनिर्भर दिवाळी अंतर्गत महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि. यांच्या सीएसआर अंतर्गत 5 हजार कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात येत आहे.
advertisement
4/7
या उपक्रमा अंतर्गत पुणे येथील शेकडो बांधकाम व बिगारी मजूर यांना महा एनजीओचे फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात येतं आहे.
advertisement
5/7
महा एनजीओ फेडरेशन पुण्यातील 50 एनजीओना सोबत घेऊन ही आत्मनिर्भर दिवाळी साजरी करत आहे.
advertisement
6/7
महाराष्ट्रातील 2 हजार हून अधिक सामजिक संस्थांची शिखर संस्था म्हणजे महाएनजीओ फेडरेशन होय. श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने 15 ऑगस्ट 2018 रोजी याची पुणे येथे स्थापना झाली.
advertisement
7/7
सामजिक संस्था समाजात निर्हेतूकपणे समृद्ध व सशक्त समाज निर्मितीसाठी काम करत असतात. असे अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत मात्र त्या एक संघ नव्हत्या. त्या सर्वांना एका छत्राखाली आणण्याचे कार्य महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात येतं आहे.