TRENDING:

Nirmala Nawale: सोशल मीडियावर हिरो, पण निवडणुकीत झिरो; कोट्यवधींच्या धनी नवले मॅडम तोंडावर आपटल्या

Last Updated:
Nirmala Nawale: सोशल मीडियावर बोलबाला असला तरी प्रत्यक्षात मात्र मतदारांनी नाकारले आहे.
advertisement
1/7
सोशल मीडियावर हिरो, पण निवडणुकीत झिरो; कोट्यवधींच्या धनी नवले मॅडम तोंडावर आपटल
कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते. कधी त्यांच्या कामाची, कधी त्यांच्या पेहरावाची तर कधी त्यांच्या गाड्यांच्या आवडी निवडीची... कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची कायमच सोशल मीडियावर बोलबाला असतो.
advertisement
2/7
यंदा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या राजकारणात नशिब आजमवण्यासाठी उतरल्या होत्या. मात्र सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या निर्मला नवलेंना मतदारांनी नाकारले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.
advertisement
3/7
निर्मला नवले या उच्चशिक्षित असून त्यांनी आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह कारेगावच्या शुभम नवले यांच्याशी झाला.
advertisement
4/7
शुभम नवले यांच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याने निर्मला यांनीही राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. अवघ्या 27 व्या वर्षी त्यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती
advertisement
5/7
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवती कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात काम करताना निर्मला नवले दिसून आल्या होत्या.
advertisement
6/7
निर्मला नवले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांना अजित पवारांकडून तिकिट देण्यात आले होते
advertisement
7/7
सोशल मीडियावर बोलबाला असला तरी प्रत्यक्षात मात्र मतदारांनी नाकारले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Nirmala Nawale: सोशल मीडियावर हिरो, पण निवडणुकीत झिरो; कोट्यवधींच्या धनी नवले मॅडम तोंडावर आपटल्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल