Success Story : जिद्द कामी आली, अपयश आले पण खचला नाही प्रगल्भ, 24 व्या वर्षी सैन्यात लेफ्टनंटपदी निवड
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अवघ्या 24 व्या वर्षी त्यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदासाठी निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे दादर परिसरासह संपूर्ण मुंबईत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला.
advertisement
1/5

दादरमधील तरुण प्रगल्भ राऊळ यांनी लहानपणापासून पाहिलेले स्वप्न अखेर साकार केले आहे. अवघ्या 24 व्या वर्षी त्यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदासाठी निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे दादर परिसरासह संपूर्ण मुंबईत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला.
advertisement
2/5
प्रगल्भ सांगतात की, लहानपणी त्यांच्या परिसरातून आर्मीची परेड निघायची. त्यावेळी त्यांचे आजोबा त्यांना परेड पाहण्यासाठी घेऊन जायचे. सैनिकांना मिळणारा सन्मान आणि आदर पाहून त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. घरी आल्यानंतर त्यांनी आजोबांना विचारले की सैनिकांना इतका मान का दिला जातो. त्यावर आजोबांनी सांगितले की हे सैनिक देशाचे रक्षण करतात. त्या क्षणापासूनच प्रगल्भ यांनी भविष्यात सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला.
advertisement
3/5
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच तयारी सुरू केली. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी सी कॅडेट कॉर्प्सच्या ट्रेनिंग शिप जवाहर येथे चार वर्षे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अकरावी-बारावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी एनसीसीचे प्रशिक्षणही पूर्ण केले.
advertisement
4/5
सैन्यात जाण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी एसएसबी परीक्षेला सुरुवात केली. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागला. सलग सहा वेळा अपयश आले तरी त्यांनी हार मानली नाही. अखेर सातव्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवत लेफ्टनंट पद मिळवले. या प्रवासात त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. प्रशिक्षणासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यासाठी त्यांनी अवघ्या 28 दिवसांत तब्बल 20 किलो वजन कमी केले. त्या काळात त्यांनी कठोर शिस्त पाळत प्रचंड मेहनत घेतली.
advertisement
5/5
प्रगल्भ लहानपणापासूनच स्काउट-गाईड आणि एनसीसीमध्ये सक्रिय होते, असे त्यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या यशामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण दादर परिसरात अभिमानाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
Success Story : जिद्द कामी आली, अपयश आले पण खचला नाही प्रगल्भ, 24 व्या वर्षी सैन्यात लेफ्टनंटपदी निवड