TRENDING:

लग्नाआधीच झाली प्रेगंन्ट, अबॉर्शन करण्याआधीच लागला 'लॉकडाऊन', साऊथची ही सायको-थ्रिलर डोकं सुन्न करेल

Last Updated:
Best Psychological Thriller Film of 2026: साऊथ इंडस्ट्रीने प्रेक्षकांना उत्तमोत्तम सिनेमे अनुभवण्याची संधी दिली. अशाच एका फिल्मने सध्या प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
advertisement
1/11
लग्नाआधीच झाली प्रेगंन्ट, अबॉर्शन करण्याआधीच लागला 'लॉकडाऊन', साऊथची ही सायको-थ्रिलर डोकं सुन्न करेल
2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी अतिशय भयानक सिद्ध झालं. कोरोना व्हायरससारखा जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाल्याने असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
advertisement
2/11
संपूर्ण जगात लॉकडाऊन पाळण्यात आल्याने जनजीवन ठप्प झाले होते. याच पार्श्वभूमीवर आधारित एका सिनेमाने सध्या प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
advertisement
3/11
बहुचर्चित तामिळ थ्रिलर फिल्म 'लॉकडाउन' जानेवारी २०२६ मध्ये चित्रपटगृहात दाखल झाला आणि प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. आता हा सिनेमा आज, बुधवार ११ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडकला असून, हा थरार आता घरबसल्या अनुभवता येणार आहे.
advertisement
4/11
साऊथ इंडस्ट्रीने प्रेक्षकांना उत्तमोत्तम सिनेमे अनुभवण्याची संधी दिली. असाच एक सिनेमा म्हणजे 'लॉकडाउन'. दिग्दर्शक एआर जीवा यांनी या काळातील एका वेगळ्याच सामाजिक समस्येवर प्रकाश टाकला आहे.
advertisement
5/11
ही गोष्ट आहे चेन्नईत राहणाऱ्या अनिताची. अनिता एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठी मुलगी आहे, जिच्यावर घराची जबाबदारी आहे.
advertisement
6/11
एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी लागली आहे, लोक घरात कैद आहेत. पण अनिताच्या मनात एक असं रहस्य दडलंय, जे बाहेर आलं तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.
advertisement
7/11
अनिता अविवाहित आहे आणि तिला अचानक समजतं की ती गरोदर आहे. बाहेर कडक लॉकडाऊन, घरात कडक शिस्तीचं कुटुंब आणि मनात भीतीचा डोंगर. तिचे मित्र तिला गर्भपाताचा सल्ला देतात, पण घराबाहेर पडणं अशक्य आहे.
advertisement
8/11
एकाकी पडलेली ही मुलगी या भीषण परिस्थितीशी कशी दोन हात करते, हा प्रवास पाहताना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतो. विशेष म्हणजे, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते.
advertisement
9/11
लग्नाआधी गरोदर झालेल्या तरुणीला समाजात आणि कायद्याच्या चौकटीत कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचे वास्तववादी चित्रण यात करण्यात आले आहे.
advertisement
10/11
अनुपमा परमेश्वरनचा अभिनय या चित्रपटाचा खरा प्राण आहे. तिच्या चेहऱ्यावरील हतबलता आणि मानसिक ताण पाहून प्रेक्षकही सुन्न होतात.
advertisement
11/11
जर तुम्ही थिएटरमध्ये हा सिनेमा मिस केला असेल, तर आता तो अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. तमिळ आणि तेलुगू व्यतिरिक्त, हा सिनेमा हिंदी भाषेतही डब करून प्रदर्शित करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाआधीच झाली प्रेगंन्ट, अबॉर्शन करण्याआधीच लागला 'लॉकडाऊन', साऊथची ही सायको-थ्रिलर डोकं सुन्न करेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल