LPG : ही पहिली वेळ नाही.... 2026 पूर्वी भारतात कधी निर्माण झाला होता गॅसचा तुटवडा? पाहा यादी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे सगळं का घडतंय? याचं मूळ आपल्या घरापासून हजारो मैल दूर असलेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धात दडलंय. आखाती देशांतील या तणावामुळे भारताच्या स्वयंपाकघरावर काय परिणाम झाला आहे. पण असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही असाच प्रकार घडला होता, त्यासंकटाला देशानं तोंड दिलं आहे. चला पाहू कधीकधी घडला होता असा प्रकार.
advertisement
1/9

सकाळी उठल्यापासून गृहिणींची पहिली धाव स्वयंपाकघराकडे असते. गॅस पेटला की घराचं चक्र सुरू होतं. पण, गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांत "गॅस संपलाय" किंवा "सिलेंडर यायला वेळ लागेल" अशी उत्तरं ऐकायला मिळत आहेत. गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर्सच्या रांगा आणि हताश नागरिक असं चित्र सध्या पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. हॉटेल व्यावसायिक तर आता गॅसअभावी किचन बंद करण्याच्या तयारीत आहेत.
advertisement
2/9
हे सगळं का घडतंय? याचं मूळ आपल्या घरापासून हजारो मैल दूर असलेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धात दडलंय. आखाती देशांतील या तणावामुळे भारताच्या स्वयंपाकघरावर काय परिणाम झाला आहे. पण असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही असाच प्रकार घडला होता, त्यासंकटाला देशानं तोंड दिलं आहे. चला पाहू कधीकधी घडला होता असा प्रकार.
advertisement
3/9
1973 चे तेल संकटजेव्हा पाश्चिमात्य देशांतील तणावामुळे जगात पहिल्यांदा मोठं तेल संकट आलं होतं. तेव्हा भारताची गरज आजच्या तुलनेत कमी होती, तरीही अर्थव्यवस्थेला मोठे हादरे बसले होते. आज 2026 मध्ये पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
advertisement
4/9
2012 चा 'कोलकाता' पॅटर्नकोलकात्यात बिगर-घरगुती सिलेंडर्सचा तुटवडा इतका वाढला होता की शेकडो रेस्टॉरंट्सना कुलूप लागलं होतं. आजच्या परिस्थितीत हॉटेल व्यावसायिक त्याच भीतीखाली जगत आहेत.
advertisement
5/9
2013 ची मर्यादासरकारने एका कुटुंबाला वर्षाला ठराविकच सबसिडीचे सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाही एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या आणि काळाबाजार (Black marketing) शिगेला पोहोचला होता.
advertisement
6/9
2015 ची 'केवायसी' (KYC)एकाच पत्त्यावर अनेक कनेक्शन शोधण्यासाठी जेव्हा कागदपत्रं मागितली गेली, तेव्हा लोकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळीही अनेकांना गॅसचा तुटवड्याला सामोरं जावं लागलं होतं.
advertisement
7/9
यंदाचं संकट नेमकं काय आहे?सध्याच्या टंचाईचं मुख्य कारण म्हणजे 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz). जगातील कच्च्या तेलाचा आणि गॅसचा मोठा हिस्सा याच अरुंद समुद्री मार्गातून प्रवास करतो. इराण-अमेरिका युद्धामुळे हा मार्ग असुरक्षित झाला असून पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली आहे. सरकार म्हणतंय की हा परिणाम 'तात्पुरता' आहे, पण जमिनीवरचं वास्तव वेगळं आहे. एलपीजी सिलेंडर्सची होम डिलिव्हरी रखडली असून रिफिलिंगसाठी 10 ते 15 दिवसांचा वेटिंग पिरियड दिसत आहे.
advertisement
8/9
सामान्यांनी काय करावे?1. पॅनिक बुकिंग टाळा: साठा करण्याची प्रवृत्ती टंचाईला अधिक निमंत्रण देते.2. पर्यायी इंधन: जिथे शक्य आहे तिथे इंडक्शन कुकटॉप किंवा सौर ऊर्जेचा वापर वाढवावा.3. काळाबाजारापासून सावध: गॅस एजन्सीच्या अधिकृत ॲपवरूनच बुकिंग करा आणि अव्वाच्या सव्वा किंमत मागणाऱ्यांपासून सावध राहा.
advertisement
9/9
1973 असो वा 2016 जागतिक राजकारणातील ठिणगी आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतेच. हे तात्पुरतं संकट असलं तरी, ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं ही काळाची गरज आहे, हेच या संकटाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
LPG : ही पहिली वेळ नाही.... 2026 पूर्वी भारतात कधी निर्माण झाला होता गॅसचा तुटवडा? पाहा यादी