Mumbai Pune Expressway: बोर घाटात पुन्हा कारला आग, बोगद्याजवळ डस्टर गाडी जळून खाक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mumbai Pune Expressway: चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
advertisement
1/5

खंडाळा बोर घाट परिसरात वाहनांना आग लागण्याच्या घटना सुरूच असून आज पुन्हा एकदा खंडाळा बोगद्याजवळ डस्टर कारला अचानक आग लागल्याची घटना घडली.
advertisement
2/5
या आगीत गाडी काही मिनिटांतच जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बोर घाटातून जात असताना डस्टर कारमधून अचानक धूर निघू लागला.
advertisement
3/5
चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
advertisement
4/5
मात्र काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण गाडी भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
advertisement
5/5
या घटनेमुळे काही काळ बोर घाटातील वाहतूक मंदावली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Mumbai Pune Expressway: बोर घाटात पुन्हा कारला आग, बोगद्याजवळ डस्टर गाडी जळून खाक