TRENDING:

अस्सल शिक कढई, सोलापुरात अशी चवं कुठेच नाही, एकदा खाल तर पुन्हा याल

Last Updated:
सोलापुरातील मल्हारी नरसिंह चाकोते यांच्या मटन भोजनालयातील शिक कढई प्रसिद्ध आहे. ब्रिटिश राजवटीत सुरू केलेला हा व्यवसाय आजही चालू आहे. महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल होते.
advertisement
1/5
अस्सल शिक कढई, सोलापुरात अशी चवं कुठेच नाही, एकदा खाल तर पुन्हा याल
सोलापुरात वेगवेगळे फेमस पदार्थ खायला मिळतात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे शिक कढई हा होय. नरसिंह चाकोते यांनी ब्रिटिश राजवटीच्या काळात सोलापुरात या व्यवसायाची सुरुवात केली. वयाच्या 81 व्या वर्षी देखील मल्हारी नरसिंह चाकोते पुढे नेण्याचे काम करत आहेत.
advertisement
2/5
येथील शिक कढई प्रसिद्ध असल्यामुळे खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मटन भोजनालयामध्ये शिक कढई बनवली जाते. चाकोते यांना व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
3/5
आंध्र प्रदेशमधील चाकोते कुटुंब हे मूळचे रहिवासी आहे. मल्हारी यांचे वडील नरसिंह यांनी ब्रिटिश राजवटीच्या काळात हा व्यवसाय सुरू केलेला व्यवसाय पुढे नेण्याचे काम मल्हारी चाकोते करत आहे.
advertisement
4/5
चिकन आणि बोकडाच्या मटणापासून मल्हारी चाकोते यांच्या भोजनालयामध्ये शिक कढई बनवून दिली जाते. एक किलो शिक कढई बनवण्यासाठी मल्हारी चाकोते 280 रुपये घेतात. या ठिकाणी शिक कढई खाण्यासाठी दूरदूरून लोक येतात. महिन्याला या शिक कढईच्या व्यवसायातून मल्हारी चाकोते महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
advertisement
5/5
या ठिकाणी काही जण शिक कढई बनवून खाण्यासाठी घरी घेऊन जातात, तर काहीजण तिथेच बसून खातात. सोबतच ज्वारीची कडक भाकरी देखील खाण्यासाठी दिली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
अस्सल शिक कढई, सोलापुरात अशी चवं कुठेच नाही, एकदा खाल तर पुन्हा याल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल