IPL Schedule 2026 : यंदा ट्रॉफी आपलीच! मुंबई इंडियन्सचा विजय पक्का, हार्दिक पांड्या तीच रणनिती वापरणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दुसरा सामना हा मुंबई इंडियन्सचा असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना पार पडणार आहे. या सामन्याआधीच मुंबईचे फॅन्स यंदाची ट्रॉफी आपलीच असा दावा करत आहे.
advertisement
1/8

आयपीएल 2026 च्या पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. 28 मार्च ते 12 एप्रिल 2026 दरम्यान आयपीएलचा पहिला टप्पा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 20 सामने खेळवले जाणार आहे.
advertisement
2/8
खरं तर तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलचे संपू्र्ण वेळापत्रक जाहीर होणार आहे.
advertisement
3/8
आयपीएलच्या 2026 मधील 19 व्या हंगामात पहिला सामना हा रॉयल चँलेजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी मैदानात खेळवला जाणार आहे.
advertisement
4/8
तर दुसरा सामना हा मुंबई इंडियन्सचा असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना पार पडणार आहे. या सामन्याआधीच मुंबईचे फॅन्स यंदाची ट्रॉफी आपलीच असा दावा करत आहे.
advertisement
5/8
पण पहिल्याच सामन्याआधी आणि फायनल पार पडली नसताना मुंबई इंडियन्स असा दावा कसा करू शकते.तर त्यामागे एक योग जुळून आला आहे.
advertisement
6/8
मुंबई इंडियन्स रविवारी वानखेडेच्या स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स प्रथमच आपल्या कॅम्पेशनची सुरूवात घरच्या मैदानातून करणाक आहे.
advertisement
7/8
2019 मध्ये मुंबई इंडियनस त्यांचा पहिला सामना हा घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळला होता.त्यात दिल्लीने 37 धावांनी सामना जिंकला होता.
advertisement
8/8
पण जरी पहिल्या सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला नसला तरी त्या हंगामाची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने जिंकली होती.त्यामुळे हा योगायोग यंदाही जुळून आला आहे.आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स सहाव्यांदा ट्रॉफी उचलणार अशा विश्वास चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL Schedule 2026 : यंदा ट्रॉफी आपलीच! मुंबई इंडियन्सचा विजय पक्का, हार्दिक पांड्या तीच रणनिती वापरणार?