उन्हाळ्याची सुरुवात झाली की, पोटाशी संबंधित आजार सुरु होतात. भूक कमी होते आणि थंड पेयं प्यावीशी वाटतात. उन्हाळ्यात मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानं पोट आणि छातीत जळजळ होऊ शकते आणि काहींना डोकेदुखी देखील जाणवते. पण, छाती आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण केवळ आहार नाही तर वाढलेलं आम्ल आणि पित्त विकार देखील आहेत.
advertisement
शरीरात पित्त आणि आम्लाचं प्रमाण वाढल्याची ही लक्षणं असू शकतात. पित्त जास्त होतं तेव्हा छातीत जळजळ, आंबट ढेकर येणं, डोके जड होणं किंवा डोळ्यांत जळजळ होणं अशी विविध लक्षणं दिसू शकतात.
Body Pain : सकाळी उठल्यावर अंगदुखी जाणवते ? व्यायाम न करताही अंग का दुखतं ?
पोटाच्या विकारांवर आयुर्वेदात काही उपाय सुचवलेत. शतावरी, शंख राख आणि ज्येष्ठमध असे थंड आणि पित्त शांत करणारे पदार्थ आयुर्वेदात सुचवण्यात आलेत. या पदार्थांच्या योग्य प्रमाणानं शरीरातील अग्नि शांत करण्यासाठी आणि पित्त संतुलित करण्यास मदत होते.
रात्री उशिरा खाणं, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणं, जास्त चहा आणि कॉफी पिणं, जास्त ताणतणाव आणि जास्त वेळ उपाशी राहणं यामुळे देखील पोटातील आम्ल वाढू शकतं. याचा सामना करण्यासाठी शतावरी आणि शंखाची राख खाऊ शकता. दोन्ही समान प्रमाणात खाल्ल्यानं पोट थंड होतं आणि आम्ल उत्पादन कमी होतं.
याव्यतिरिक्त, ज्येष्ठमध आणि साखरेमुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. कोमट दूध किंवा पाण्यासोबत या दोघांचं मिश्रण घ्या. यामुळे पोटातील उष्णता कमी होते आणि छाती आणि घशातील जळजळ कमी होते.
Summer Care : उन्हाळ्यात जेवणासोबत कांदा का खातात ? जाणून घेऊया कारणं
पोटातील आम्लतेचे परिणाम कमी करण्यासाठी आणि पित्त संतुलित करण्यासाठी काही सोपे उपाय करुन पाहता येतील.
सूर्यास्तापूर्वी रात्रीचं जेवण करा. जेवणानंतर लगेच बसण्याऐवजी, थोडा वेळ फिरा. यामुळे अन्न चांगलं पचण्यास मदत होईल आणि गॅस आणि ढेकर येणं कमी होईल. उन्हाळ्यात, दलिया आणि लापशी यासारखे पोट थंड करणारे हलके पदार्थ खाण्यावर भर द्या.
