कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असताना या उष्णतेचा परिणाम मुक्या वन्यप्राण्यांवरही होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील सिद्धार्थ उद्यान प्रशासनाने वाघ आणि सिंहांसाठी विशेष कूलिंग व्यवस्था सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा देखील 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असताना या उष्णतेचा परिणाम मुक्या वन्यप्राण्यांवरही होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील सिद्धार्थ उद्यान प्रशासनाने वाघ आणि सिंहांसाठी विशेष कूलिंग व्यवस्था सुरू केली आहे.
सिद्धार्थ उद्यानात सध्या पाच बंगाली वाघ, चार पांढरे वाघ आणि सिंहाची एक जोडी अशी एकूण दहा मोठे वन्यप्राणी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत या प्राण्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या पिंजऱ्यांमध्ये मोठ्या क्षमतेचे कुलर बसवण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हात वाघ आणि सिंह या कुलरसमोर बराच वेळ बसून थंडावा घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
advertisement
याशिवाय दुपारच्या वेळी तापमान अधिक वाढल्यावर उद्यानातील कर्मचारी प्राण्यांच्या अंगावर आणि त्यांच्या परिसरात पाइपच्या सहाय्याने थंड पाण्याचा शिडकावा करतात. पिंजऱ्यांच्या परिसरातील जमीन ओलसर ठेवली जाते, ज्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होण्यास मदत होते. काही ठिकाणी प्राण्यांना पाण्यात खेळता यावे यासाठी पाण्याचे छोटे टब आणि तलावसदृश जागाही ठेवण्यात आल्या आहेत.
advertisement
अनेक वर्षांपासून प्राण्यांची काळजी घेणारे कर्मचारी मोहम्मद जिया करत आहेत. ते नियमितपणे वाघ आणि सिंहांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात, कुलर योग्य प्रकारे चालू आहेत का याची तपासणी करतात तसेच गरजेनुसार पाण्याचा शिडकावा करून प्राण्यांना थंडावा मिळेल याची काळजी घेतात. प्राण्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी त्यांना वेळोवेळी पाणी आणि आहार देखील योग्य प्रमाणात दिला जातो. त्यांच्या आहारातही काही बदल करण्यात येतात. पचायला हलका आणि शरीराला उष्णता कमी देणारा आहार देण्यावर भर दिला जातो. तसेच प्राण्यांच्या आरोग्याची नियमित तपासणीही केली जाते.
advertisement
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:35 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video









