advertisement

Extramarital Dating Apps : 40 लाख भारतीयांचं एक्स्ट्रा-मॅरिटल डेटिंग अ‍ॅपवर अकाउंट; यादीमध्ये कोणत्या शहरातील लोक सर्वात टॉपवर? पाहा लिस्ट

Last Updated:

Extramarital Dating Apps : जगातील पहिल्या एक्स्ट्रा-मॅरिटल डेटिंग प्लॅटफॉर्मने भारतात नुकताच 40 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पण हे लोक कोण आहेत? कोणत्या शहरातील आहेत? आणि मुख्य म्हणजे या अ‍ॅपवर नेमकी काय 'सर्कस' सुरू आहे? हे जाणून घेणं रंजक ठरेल.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : आपल्या समाजात लग्न हा एक पवित्र आणि आयुष्यभराचा प्रवास मानला जातो. पण काळाच्या ओघात आधुनिक जीवनशैली आणि बदलत्या विचारसरणीमुळे मानवी नात्यांचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. ज्या देशात 'सात जन्मांच्या गाठी' मारल्या जातात, तिथेच आता एका 'डिजिटल क्रांती'ने जन्म घेतला आहे. ही क्रांती आहे. एक्स्ट्रा-मॅरिटल डेटिंग.
एकेकाळी दबक्या आवाजात चर्चा होणारा हा विषय आता थेट स्मार्टफोनच्या स्क्रीनवर आला आहे. 'ग्लिडन' (Gleeden) या जगातील पहिल्या एक्स्ट्रा-मॅरिटल डेटिंग प्लॅटफॉर्मने भारतात नुकताच 40 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पण हे लोक कोण आहेत? कोणत्या शहरातील आहेत? आणि मुख्य म्हणजे या अ‍ॅपवर नेमकी काय 'सर्कस' सुरू आहे? हे जाणून घेणं रंजक ठरेल.
advertisement
तुम्हाला वाटेल की मुंबई-दिल्ली यांसारखी शहरं यात आघाडीवर असतील, पण आकडेवारी काही वेगळंच सांगतेय. या प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त युजर्स असणाऱ्या शहरांच्या यादीत दक्षिणेकडील शहरांनी बाजी मारली आहे.
विशेष म्हणजे, हे अफेअर्स आता केवळ मेट्रो शहरांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. लखनौ, चंदीगड, सुरत, भुवनेश्वर, कोइम्बतूर, पाटणा, गुवाहाटी आणि रायपूर यांसारख्या टायर-2 शहरांमध्येही विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅप्सचा वापर वेगाने वाढत आहे.
advertisement
भारतातील विवाहबाह्य डेटिंगचा कल प्रामुख्याने दक्षिण भारतातील मोठ्या शहरांमध्ये आणि आयटी हब (IT Hubs) मध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. या यादीत 18% युजर्ससह 'आयटी कॅपिटल' बंगळुरू प्रथम क्रमांकावर आहे, तर त्यापाठोपाठ 17% युजर्ससह हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर भारतात दिल्लीत हे प्रमाण 11% आहे, तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरे असलेल्या मुंबई (9%) आणि पुणे (7%) लोक या ऍपचा वापर करत आहेत. ज्या शहरांमध्ये कॉर्पोरेट संस्कृती आणि कामाचा ताण जास्त आहे, तिथे अशाप्रकारच्या डिजिटल व्यासपीठांचा वापर अधिक होताना दिसत आहे.
advertisement
या अहवालातील सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांचा वाढता कल. ग्लिडनच्या एकूण युजर्समध्ये 65% पुरुष आणि 35% महिला आहेत. गेल्या दोन वर्षांत महिलांच्या नोंदणीत तब्बल 148% वाढ झाली आहे. ग्लिडन इंडियाच्या कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल म्हणतात, "हा आकडा आधुनिक भारतीय महिलांच्या वाढत्या आत्मविश्वासाचं आणि स्वतंत्र निवडीचं प्रतीक आहे."
कोणत्या वेळी सर्वाधिक 'गप्पा' रंगतात?
advertisement
या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते दिवसातून सरासरी 1 ते 1.5 तास घालवतात. चॅटिंगसाठी दोन विशेष वेळा 'पीक टाइम' मानल्या जातात:
1. दुपारी 12 ते 3: जेव्हा कामाच्या ब्रेकमध्ये किंवा दुपारच्या निवांत वेळी खासगी चॅटिंगसाठी वेळ मिळतो.
2. रात्री 10 ते मध्यरात्र: जेव्हा घरात गोपनीयता (Privacy) असते, तेव्हा या अ‍ॅप्सवर सर्वाधिक हालचाल पाहायला मिळते.
advertisement
युजर्सच्या निवडीमध्येही एक विशेष पॅटर्न दिसून आला आहे:
पुरुष: 25 ते 30 वयोगटातील महिलांना अधिक पसंती देतात.
महिला: 30 ते 40 वयोगटातील पुरुषांना प्राधान्य देतात.
प्रोफेशनल चॉईसमध्ये महिला युजर्स आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या पुरुषांकडे, विशेषतः डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी (Senior Executives) आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. करिअरमधील स्थैर्य हे आजही नात्यांमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरत आहे.
advertisement
भारतात विवाहसंस्थेचे महत्त्व आजही अबाधित असले, तरी नात्यांमधील गुंतागुंत आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल व्यासपीठांचा आधार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 'ग्लिडन'वरील भारतीयांचा 40 लाखांचा हा आकडा बदलत्या सामाजिक आणि भावनिक जडणघडणीचा एक मोठा आरसा आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Extramarital Dating Apps : 40 लाख भारतीयांचं एक्स्ट्रा-मॅरिटल डेटिंग अ‍ॅपवर अकाउंट; यादीमध्ये कोणत्या शहरातील लोक सर्वात टॉपवर? पाहा लिस्ट
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement