advertisement

Summer Care : उन्हाळ्यात कच्चा कांदा खावा की नाही ? कांदा खाल्ल्यानं काय होतं ? वाचा उन्हाळ्यात कांदा खाण्यचे असंख्य फायदे

Last Updated:

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. अशावेळी मुख्यत: शरीराला थंड ठेवणारे पदार्थ खाण्यावर भर असतो. यातलाच एक म्हणजे कच्चा कांदा खाणं. कच्चा कांदा उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करू शकतो.

News18
News18
मुंबई : उन्हाळा सुरु झालाय आणि हळूहळू तापमान वाढायला सुरुवात होईल. उन्हाळा म्हटलं की विदर्भात डोक्यावर टोपीच्या आत कांदा ठेवतात. तसाच जेवणाच्या ताटातही कांदा दिसायला सुरुवात होते. काही जणांच्या ताटात एरवीही कांदा असतो पण उन्हाळ्यात कांदा हमखास दिसतो.
उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. अशावेळी मुख्यत: शरीराला थंड ठेवणारे पदार्थ खाण्यावर भर असतो. यातलाच एक म्हणजे कच्चा कांदा खाणं. कच्चा कांदा उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करू शकतो.
advertisement
कच्चा कांदा फायदेशीर का मानला जातो समजून घेऊया. आरोग्य माहिती देणारी वेबसाइट मेट्रोपोलिसइंडियाच्या अहवालानुसार, कच्च्या कांद्यात अनेक आवश्यक पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन सी असतं, हा घटक त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. कारण कोलेजन तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. याव्यतिरिक्त, त्यात फोलेट असतं, पेशींची निर्मिती आणि डीएनए विकासात याची भूमिका महत्त्वाची असते.
advertisement
कांद्यामधे पोटॅशियमचं प्रमाण देखील भरपूर असतं. मज्जातंतूंचं कार्य आणि रक्तदाब राखण्यासाठी याचा उपयोग होतो. फायबरमुळे पचन सुधारण्यासाठी मदत होते. कांद्यात क्वेरसेटिनसारखे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. सूज कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी याचा उपयोग होतो.
कच्चा कांदा का खावा?
कच्च्या कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असतं. उष्ण हवामानात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी याची मदत होते. शरीरातल्या द्रवपदार्थांचं संतुलन आणि डिहायड्रेशन रोखण्यासाठी याची मदत होते. याव्यतिरिक्त, कच्चा कांदा त्याच्या थंड प्रकृतीसाठी ओळखला जातो. यामुळे शरीराचं तापमान राखण्यास मदत होते. त्यामुळे घाम येणं देखील वाढतं, ज्यामुळे नैसर्गिकरित्या शरीर थंड होतं. म्हणूनच, उन्हाळ्यात ते सॅलड किंवा साइड डिश म्हणून खाणं फायदेशीर मानलं जातं.
advertisement
कच्च्या कांद्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि क्वेर्सेटिनसारखे अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे शरीराच्या पेशींचं ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण होतं आणि संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होते.
कच्च्या कांद्यामधील फायबर पचन सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो आणि आतड्यांचं कार्य सुधारू शकतं. कांद्यात आढळणारे काही एंजाइममुळे अन्न पचणं सोपं होतं.
advertisement
रक्तातील साखर नियंत्रण - कच्च्या कांद्यात नैसर्गिक गोडवा असतो पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यातील काही घटक रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करू शकतात. म्हणूनच, मधुमेह असलेल्यांसाठी देखील ते मर्यादित प्रमाणात आहारात असणं फायदेशीर मानलं जातं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Care : उन्हाळ्यात कच्चा कांदा खावा की नाही ? कांदा खाल्ल्यानं काय होतं ? वाचा उन्हाळ्यात कांदा खाण्यचे असंख्य फायदे
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement