advertisement

400 कोटी बजेट असलेल्या चित्रपटाची ओटीटीवर क्रेझ! सुपरस्टारचं स्टारडमही कामी आलं नाही

Last Updated:
टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध सुपरस्टारचा 400 कोटी बजेट असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असा फ्लॉप ठरला त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटासाठी जेवढे काही पैसे लावले होते, तेवढे सर्व फुकट गेले. त्या चित्रपटामुळे निर्माता पूर्णपणे बुडाला. चित्रपटातल्या कलाकाराचे जितकेही स्टारडम होते, त्याचा तस्सूभरही वापर झाला नाही. बॉक्स ऑफिसवर हा फ्लॉप ठरलेला चित्रपट ओटीटीवर रिलीज होताच, त्याने सर्व काही चित्रच बदलून टाकलं. ज्या चित्रपटाला थिएटर्समध्ये प्रेक्षक पाहायला जात नव्हते, तो चित्रपट सध्या ओटीटीवर कमालीचा ट्रेंडिंगला आहे.
1/7
The Raja Saab OTT Trending Jio Hotstar, Prabhas 400 Crore Budget Movie OTT Success, The Raja Saab Box Office Failure Reason, Prabhas vs Sanjay Dutt The Raja Saab Review, Latest South Movies on OTT 2026
बिग बजेट चित्रपट आणि सुपरस्टारचे तगडे स्टारडम असूनही त्या चित्रपटासाठी थिएटर्समध्ये प्रेक्षकच नव्हते. हा चित्रपट थिएटरमध्ये खूप विचित्र पद्धतीने फ्लॉप झाला. यामुळे निर्मात्यांना लाखोंचे नुकसान झाले. जेव्हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला तेव्हा संपूर्ण चित्रच बदललं. चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर, चित्रपट चांगलाच ओटीटीवर ट्रेंडिंगला आला आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, तो दुसरा तिसरा चित्रपट कोणताही नसून प्रभासचा ‘द राजा साब’ आहे.
advertisement
2/7
The Raja Saab OTT Trending Jio Hotstar, Prabhas 400 Crore Budget Movie OTT Success, The Raja Saab Box Office Failure Reason, Prabhas vs Sanjay Dutt The Raja Saab Review, Latest South Movies on OTT 2026
'बाहुबली' फेम प्रभासचा गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘द राजा साब’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर जरीही चित्रपटाला यश मिळाले नसले तरीही ओटीटीवर मात्र प्रेक्षकांचे मन जिंकले. चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये टॉप मध्ये पाहायला मिळत आहे.
advertisement
3/7
The Raja Saab OTT Trending Jio Hotstar, Prabhas 400 Crore Budget Movie OTT Success, The Raja Saab Box Office Failure Reason, Prabhas vs Sanjay Dutt The Raja Saab Review, Latest South Movies on OTT 2026
‘द राजा साब’ चित्रपटासाठी थिएटर्समध्ये एकही प्रेक्षक नव्हता, पण तरीही या हॉरर-कॉमेडीने चित्रपटाने ओटीटीवर सर्वांचेच लक्ष वेधले. प्रभासच्या स्वॅग आणि चित्रपटाच्या लोकप्रियतेची सर्वत्र चर्चा होत आहे, ज्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. प्रभास व्यतिरिक्त, चित्रपटात निधी अग्रवाल, संजय दत्त, मालविका मोहनन आणि जरीना वहाब या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
4/7
The Raja Saab OTT Trending Jio Hotstar, Prabhas 400 Crore Budget Movie OTT Success, The Raja Saab Box Office Failure Reason, Prabhas vs Sanjay Dutt The Raja Saab Review, Latest South Movies on OTT 2026
खरंतर, प्रभास, नावामुळेच थिएटरबाहेर लांबच लांब रांगा लागतात, पण प्रभाससोबत ‘द राजा साब’ चित्रपटाबद्दल असं काहीच घडलं नाही. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना अपेक्षा होती की ह्या चित्रपटातून प्रभासला एका नव्या अवतारात पाहायला मिळेल. कारण, निर्मात्यांनी चित्रपटाच्या VFX आणि सेट डिझाइनसाठी करोडो रूपये खर्च केले होते.
advertisement
5/7
The Raja Saab OTT Trending Jio Hotstar, Prabhas 400 Crore Budget Movie OTT Success, The Raja Saab Box Office Failure Reason, Prabhas vs Sanjay Dutt The Raja Saab Review, Latest South Movies on OTT 2026
400 कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये रिलीज झाला तेव्हा सुरुवातीच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक होत्या. परंतु कथानक आणि कॉमेडीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सुपरस्टारचे स्टारडम सुद्धा चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवू शकला नाही.
advertisement
6/7
The Raja Saab OTT Trending Jio Hotstar, Prabhas 400 Crore Budget Movie OTT Success, The Raja Saab Box Office Failure Reason, Prabhas vs Sanjay Dutt The Raja Saab Review, Latest South Movies on OTT 2026
चित्रपट थिएटर रिलीजनंतर लगेचच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चित्रपट ओटीटीवर रिलीज होताच रातोरात ट्रेंडिंग लिस्टमध्ये आला. ज्या प्रेक्षकांनी चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांनी प्रभासच्या हॉरर- कॉमेडीला घरून पाहणं पसंद केले आहे. फिल्म क्रिटिक्सचे असे मत आहे की, ‘द राजा साब’ चित्रपट फ्लॉप होण्याचं मुख्य कारण चित्रपटाचं कथानक.
advertisement
7/7
The Raja Saab OTT Trending Jio Hotstar, Prabhas 400 Crore Budget Movie OTT Success, The Raja Saab Box Office Failure Reason, Prabhas vs Sanjay Dutt The Raja Saab Review, Latest South Movies on OTT 2026
प्रभासच्या चाहत्यांना त्याला अ‍ॅक्शन भूमिकांमध्ये पाहणे आवडते, परंतु हा चित्रपट त्याला थोड्या विनोदी आणि भयानक परिस्थितीत सादर करतो. चित्रपटाच्या लांबीमुळे आणि काही जुन्या विनोदांमुळे प्रेक्षक नाराज झाले.हा चित्रपट वन टाईम वॉच असून जिओ हॉटस्टारवर रिलीज झालेला आहे. टॉप 10 चार्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हा चित्रपट आहे. 400 कोटींचं बजेट असलेल्या ह्या चित्रपटाने जगभरात जेमतेम 208 कोटींचीच कमाई केलेली आहे.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement