एक लहान निर्णय आणि महिन्याला होईल 3,550 रुपयांची बचत! डेली प्रवास करणाऱ्यांसाठी बेस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही रोज 50 किमी किंवा त्यापेक्षा जास्त कार चालवत असाल तर पेट्रोलवरील कर्च तुमचा खिसा रिकामा करु शकतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, फॅक्ट्री फिडेट सीएनजी कारने दरमहा 3,500 रुपयांची बचत होऊ शकते. चला पाहूया डिटेल्स...
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह पूर्ण देशात ऑफिस जाणाऱ्या लोकांसाठी डेटील कम्यूटिंग एक मोठा खर्च आहे. तुम्हीही रोज 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त कार चालवत असाल तर पेट्रोलची महागाई तुमच्या खिशावर भार टाकू शकते. मार्च 2026 मध्ये दिल्लीत पेट्रोलची किंमत 4.77 रुपये प्रति लिटर आहे. तर CNG फक्त 77.09 रुपये प्रति किलोग्रामवर उपलब्ध आहे.
अशा परिस्थितीत, फॅक्टरी-फिटेड सीएनजी किट असलेली कार केवळ इंधनाची लक्षणीय बचत करत नाही तर पेट्रोलपेक्षा जवळजवळ निम्मी किंमत देऊन दरमहा हजारो रुपये वाचवू शकते. हा मार्केटिंगचा दावा नाही, तर संपूर्ण गणित आहे, जे आपण आज टप्प्याटप्प्याने समजावून सांगू. दररोज ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी हा सर्वोत्तम पर्याय का आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया.
advertisement
किंमतीमध्ये किती अंतर
सर्वात आधी समजून घेऊया की, सध्याच्या फ्यूल प्राइजची काय अवस्था आहे. दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये सीएनजी स्टेशन प्रत्येक कोपऱ्यात उपलब्ध आहे. तिथे पेट्रोल आणि सीएनजीच्या किंमतीत मोठा फरक आहे. पेट्रोल 94.77 रुपये/लिटर आहे. तर सीएनजी फक्त 77.09 रुपये/किलो आहे. मात्र बचत फक्त किमतीत नाही तर मायलेजमधूनही होते.
advertisement
किती बचत होईल?
आता खरे गणित येते: पेट्रोल विरुद्ध फॅक्टरी-फिटेड सीएनजी चालवण्याचा खर्च. चला एक वास्तविक उदाहरण घेऊया, जे ऑफिस प्रवाशांसाठी सर्वात संबंधित आहे. समजा तुमची कार मारुती सुझुकी स्विफ्ट किंवा वॅगनआर सीएनजी सारखी लोकप्रिय फॅक्टरी-फिटेड सीएनजी मॉडेल आहे.
advertisement
शहरातील वाहतुकीत पेट्रोल कारचे वास्तविक मायलेज साधारणपणे 15-18 किमी/लीटर असते. दरम्यान, फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार शहरात 24-28 किमी/लीटर इतके वास्तविक मायलेज सहजपणे मिळवू शकते. कॅलक्युलेशन असे असेल:
पेट्रोल कारचा खर्च (रियल सिटी ड्रायव्हिंग)
- मायलेज - 16 किमी/लिटर (सरासरी ट्रॅफिक)
- प्रति किलोमीटर खर्च - 94.77 ÷ 16 = ₹5.92 प्रति किमी
advertisement
फॅक्ट्री फिटेड सीएनजी कारचा खर्च (रियल सिटी ड्रायव्हिंग)
- मायलेज - 25 किमी/किलो (सरासरी ट्रॅफिक)
- प्रति किलोमीटर खर्च - 77.09 ÷ 25 = ₹3.08 प्रति किमी
CNG चा खर्च पेट्रोलच्या तुलनेत जवळपास अर्धा आहे.
- पेट्रोल डेली खर्च = 50 × 5.92 = ₹296
- CNG डेली खर्च = 50 × 3.08 = ₹154
advertisement
डेली बचत = ₹142
ऑफिसला येण्या-जाण्यासाठी बेस्ट
तुम्ही 25 दिवस ऑफिसला जात असाल तर मंथली बचत 3,550 रुपये आणि वार्षिक बचत 42,600 रुपयांच्या आसपास होईल. रोज 60-70 किमी चालत असाल तर हा आकडा 50,000-60,000 वार्षिकपर्यंत पोहोचू शकतो. 3-4 वर्षात तर फॅक्ट्री CNG व्हेरिएंटचा एक्स्ट्रा अपफ्रंट कॉस्ट (50,000 ते 1 लाख रुपये पर्यंत) पूर्णपणे रिकव्हर होईल.
advertisement
हे गणित प्रत्येक कारवर लागू होते. मग स्विफ्ट असो, ब्रेझा सीएनजी असो किंवा टाटा पंच iCNG. टाटाच्या ड्यूअल सिलिंडर टेक्नॉलॉजीच्या मॉडल्समध्ये बूट स्पेसही कमी होत नाही. जो फॅक्ट्री फिटेडचा मोठा प्लस आहे. यासोबतच मारुती आणि हुंडईसारख्या कार कंपन्यांनीही ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजीसह सीएनजी कार सादर करण्यास सुरुवात केली आहे.
फॅक्टरी-फिटेड सीएनजी का निवडावे?
फॅक्टरी-फिटेड सीएनजी कारचे फायदे केवळ किमतीच्या पलीकडे जातात. आफ्टरमार्केट किट बसवल्याने मॅन्युफॅक्चरर वॉरंटी रद्द होते आणि इंजिनमध्ये समस्या उद्भवल्यास सेवा केंद्रे त्याची सेवा देण्यास नकार देऊ शकतात. फॅक्टरी-फिटेड इंजिन विशेषतः सीएनजीसाठी ट्यून केलेले असतात, ज्यामुळे कमीत कमी पॉवर लॉस (फक्त 10-15%) होतो आणि इंजिनचे आयुष्य जास्त असते. चला काही फॅक्टरी-फिटेड सीएनजी मॉडेल्सवर एक नजर टाकूया.
- मारुती वॅगनआर CNG: याची किंमत 6.5 लाखांपासून सुरु होते. ARAI मायलेज 34 किमी/किलो आहे.
- मारुती सेलेरियो CNG: सर्वात हाय मायलेज (35.44 किमी/किलो ARAI) आणि बजेटमध्ये बेस्ट ऑप्शन आहे.
- मारुती स्विफ्ट CNG : स्पोर्टी लूक, रियर मायलेज 27+ किमी/किलो, तरुणांसाठी परफेक्ट आहे.
- टाटा पंच iCNG: SUV स्टाइल, डट्यूअल सिलेंडरने बटू स्पेस चांगला, किंमत फक्त 7.5 लाख रुपयांपासून सुरू.
काय समजून घ्यावे: फॅक्टरी-फिटेड CNG कार रोजच्या ऑफिस प्रवाशांसाठी गेम चेंजर आहेत. गणित स्पष्ट आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत, त्यांची किंमत प्रति किलोमीटर सुमारे ₹3 कमी आहे. वार्षिक 40,000-50,000 ची बचत आणि कमी झालेले प्रदूषण देखील त्यांना खास बनवते. तुम्ही एक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि गणित स्वतः समजून घ्या. एकदा तुम्ही सीएनजी कार चालवली की, तुम्ही पुन्हा कधीही पेट्रोलवर जाणार नाही!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 6:57 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
एक लहान निर्णय आणि महिन्याला होईल 3,550 रुपयांची बचत! डेली प्रवास करणाऱ्यांसाठी बेस्ट








