TRENDING:

Rice : जगातील सगळ्यात महागडा तांदूळ, 1 किलोसाठी मोजावे लागतात इतके पैसे, आकडा पाहून बसेल धक्का

Last Updated:
सोने-चांदीच्या भावात विकला जाणारा हा तांदूळ खायला चविष्ट तर आहेच, पण त्यासोबतच तो आरोग्यासाठीही 'सुपरफूड' मानला जातो. चला तर मग, जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या 'किनमेमई प्रीमियम' (Kinmemai Premium Rice) तांदळाची रंजक माहिती.
advertisement
1/10
Rice : जगातील सगळ्यात महागडा तांदूळ, 1 किलोसाठी मोजावे लागतात इतके पैसे, आकडा पाहून बसेल धक्का
भारतात जेवणाचे ताट भाताशिवाय अपूर्ण मानले जाते. 'वरणा-भात' असो वा 'बिर्याणी', भात हा आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. बाजारात साधारणपणे 40 ते 100 रुपये किलो दराने आपल्याला चांगल्या प्रतीचा तांदूळ मिळतो. पण तुम्हाला माहित आहे का, जगात असाही एक तांदूळ आहे ज्याची किंमत ऐकून तुमची भूकच उडेल?
advertisement
2/10
सोने-चांदीच्या भावात विकला जाणारा हा तांदूळ खायला चविष्ट तर आहेच, पण त्यासोबतच तो आरोग्यासाठीही 'सुपरफूड' मानला जातो. चला तर मग, जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या 'किनमेमई प्रीमियम' (Kinmemai Premium Rice) तांदळाची रंजक माहिती.
advertisement
3/10
किती आहे या तांदळाची किंमत?जपानच्या 'टोयो राईस कॉर्पोरेशन' (Toyo Rice Corporation) या कंपनीने 2016 मध्ये हा तांदूळ बाजारात आणला होता. त्यावेळी 840 ग्रॅमच्या पॅकेटची किंमत 5,500 रुपयांच्या आसपास होती. पण आजच्या घडीला या तांदळाचे दर गगनाला भिडले आहेत. अधिकृत माहितीनुसार, 840 ग्रॅम तांदळासाठी आता 10,500 रुपयांहून अधिक किंमत मोजावी लागते. म्हणजेच 1 किलो तांदळाची किंमत साधारण 12,000 ते 12,500 रुपयांच्या घरात आहे.
advertisement
4/10
हा तांदूळ इतका महाग का? (खास वैशिष्ट्ये)या तांदळाची किंमत जास्त असण्यामागे केवळ ब्रँड नाही, तर त्यामागील तंत्रज्ञान आणि गुणवत्ता कारणीभूत आहे:
advertisement
5/10
धुण्याची गरज नाही: आपण साधारणपणे तांदूळ शिजवण्यापूर्वी दोन-तीन वेळा धुतो. पण किनमेमई तांदूळ धुण्याची अजिबात गरज नसते. एका खास तंत्रज्ञानाने या तांदळाला पॉलिश केले जाते, ज्यामुळे त्यातील जास्तीचा स्टार्च आणि घाण आधीच काढून टाकलेली असते.
advertisement
6/10
राईस बफिंग तंत्रज्ञान: या तांदळावर प्रक्रिया करताना 'बफिंग' तंत्रज्ञानाचा वापर होतो. यामुळे तांदळाच्या दाण्यावरील मेणासारखा थर निघून जातो जो पचायला जड असतो. परिणामी, हा भात खायला हलका आणि चवीला अप्रतिम लागतो.
advertisement
7/10
निवडक वाण आणि प्रक्रिया: हा तांदूळ तयार करण्यासाठी 'कोशिहिकारी' आणि 'पिकामारू' सारख्या जपानमधील सर्वोत्तम तांदळाच्या जाती वापरल्या जातात. इतकेच नाही, तर तांदूळ काढल्यानंतर सहा महिने तो 'फ्लेव्हर एजिंग' प्रक्रियेतून जातो, ज्यामुळे त्याची सुगंध आणि चव अधिक खुलते.
advertisement
8/10
रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा: कंपनीच्या दाव्यानुसार, या तांदळात सामान्य तांदळाच्या तुलनेत 6 पटीने जास्त LPS (Lipopolysaccharides) असतात. हा घटक शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.
advertisement
9/10
मर्यादित उत्पादन: हा तांदूळ जपानमधील ठराविक पहाडी भागात मिळतं जिथे मिनरल युक्त पाणी मिळते, तिथेच पिकवला जातो. याचे उत्पादन अतिशय मर्यादित असल्याने तो बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नाही.
advertisement
10/10
जपानची ही राईस संस्कृती आणि तंत्रज्ञान खरोखरच थक्क करणारे आहे. 12 हजार रुपये किलोचा हा भात खाणे प्रत्येकाला शक्य नसले तरी, आरोग्यासाठी लोक काय करू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rice : जगातील सगळ्यात महागडा तांदूळ, 1 किलोसाठी मोजावे लागतात इतके पैसे, आकडा पाहून बसेल धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल