Prajakta Mali : ना फोटो ना व्हिडीओ, प्राजक्ता माळी सोशल मीडियावरून गायब; 10 दिवसांपासून नॉट रिचेबल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी मागील दहा दिवसांपासून सोशल मीडियावरून गायब आहे. ती नेमकी गेली कुठे? का झालीये नॉट रिचेबल?
advertisement
1/8

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांशी सतत संपर्कात राहणारी प्राजक्ता अचानक गेल्या 10 दिवसांपासून सोशल मीडियावर दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
2/8
ना नवीन पोस्ट, ना व्हिडीओ, ना स्टोरी त्यामुळे प्राजक्ता माळी नेमकी कुठे आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
advertisement
3/8
प्राजक्ताची शेवटची पोस्ट 26 फेब्रुवारीची होती. त्या पोस्टमध्ये तिने तिच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कोणतीही नवीन पोस्ट दिसली नाही. त्यामुळे ती कुठे आहे याबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
4/8
दरम्यान प्राजक्ताने 28 फेब्रुवारीला इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. Bye Bye Phone for next 15 days असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. पुढील 15 दिवस ती फोन वापरणार नाही आणि त्यामुळे ती चाहत्यांसाठी नॉट रिचेबल असणार आहे असं तिनं सांगितलं होतं.
advertisement
5/8
सतत चाहत्यांशी संवाद साधणारी अभिनेत्री अचानक ऑफलाइन जाणार असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र या निर्णयामागे एक खास कारण आहे. प्राजक्ता सध्या बंगळुरू येथे गेली असून ती Art of Living Foundation चा विशेष कोर्स करत आहे. हा आश्रम आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी स्थापन केला आहे.
advertisement
6/8
ध्यान, योग, श्वसनक्रिया आणि मानसिक शांततेसाठी जगभरातून लोक या आश्रमात येतात. प्राजक्ता देखील या कोर्सच्या माध्यमातून काही काळ स्वतःसाठी देत असल्याचं तिनं स्वत: सांगितलं.
advertisement
7/8
प्राजक्ताने आश्रमातील प्रसिद्ध विशालाक्षी मंडपातील एक व्हिडीओ शेअर केला होता. हा मंडप आश्रमातील प्रमुख ध्यानस्थळांपैकी एक मानला जातो.
advertisement
8/8
निसर्गरम्य वातावरण, शांत परिसर आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या ठिकाणी प्राजक्ता पुढील 15 दिवस साधना, ध्यान आणि आत्मचिंतन करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : ना फोटो ना व्हिडीओ, प्राजक्ता माळी सोशल मीडियावरून गायब; 10 दिवसांपासून नॉट रिचेबल