TRENDING:

Alcohol : गॅस सिलेंडर, तेल आणि इंधनाप्रमाणे दारु ही महाग होणार? की बाजारात विकणंच बंद होणार?

Last Updated:
भारतात विदेशी स्कॉच, फ्रेंच वाईन आणि अमेरिकन बर्बन अशा प्रीमियम मद्याची आवड असणारा एक मोठा वर्ग आहे. आखाती देशांतील तणावामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद झाल्याने मद्यप्रेमींच्या चिंतेत भर पडली आहे. यावर मद्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘स्प्रिट्झ’ (Spritz) मॅगझिनचे को-फाऊंडर बिशन कुमार यांनी वक्तव्य केलं आहे.
advertisement
1/9
Alcohol : गॅस सिलेंडर, तेल आणि इंधनाप्रमाणे दारु ही महाग होणार? की बाजारात विकणंच बंद होणार?
सध्या सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा एकाच विषयाभोवती फिरतेय, ती म्हणजे 'इराण-अमेरिका युद्ध'. या युद्धामुळे इंधन, गॅस आणि खाद्यतेलाचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, सोशल मीडिया आणि मित्रमंडळींच्या गप्पांमध्ये एक वेगळाच प्रश्न चर्चिला जातोय तो म्हणजे, "पेट्रोल-डिझेलप्रमाणे आता दारूचे दरही वाढणार का?"
advertisement
2/9
भारतात विदेशी स्कॉच, फ्रेंच वाईन आणि अमेरिकन बर्बन अशा प्रीमियम मद्याची आवड असणारा एक मोठा वर्ग आहे. आखाती देशांतील तणावामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद झाल्याने मद्यप्रेमींच्या चिंतेत भर पडली आहे. यावर मद्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘स्प्रिट्झ’ (Spritz) मॅगझिनचे को-फाऊंडर बिशन कुमार यांनी सविस्तर प्रकाश टाकला आहे.
advertisement
3/9
थेट दरवाढ की केवळ चर्चा?बिशन कुमार यांच्या मते, इराण-अमेरिका युद्धामुळे मद्याच्या किमतीवर थेट किंवा तात्काळ परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. कारण, मद्य हे पेट्रोल-डिझेलसारखे दररोज 'रिफाईन' करून विकले जाणारे उत्पादन नाही. मात्र, जर हे युद्ध प्रदीर्घ काळ खेचले गेले, तर काही तांत्रिक कारणांमुळे किमतीत वाढ होऊ शकते.
advertisement
4/9
शिपिंग रूटमध्ये बदल: 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा मार्ग बंद झाल्याने जहाजांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे मालवाहतुकीचा खर्च (Freight Cost) वाढतो.
advertisement
5/9
विमा आणि इंधन खर्च: युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्री वाहतुकीसाठी लागणारा 'वॉर इन्शुरन्स' प्रचंड महागला आहे. तसेच, वाढलेल्या इंधन दरामुळे वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा बोजा ग्राहकांवर पडू शकतो.
advertisement
6/9
पुरवठा साखळीत अडथळा: स्कॉटलंडमधून येणारी व्हिस्की असो वा फ्रान्समधून येणारी वाईन, यांचा प्रवास याच समुद्री मार्गांवर अवलंबून असतो. पुरवठा कमी झाल्यास बाजारात तुटवडा निर्माण होऊन किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
7/9
जागतिक बाजारातील आकडेवारीनुसार, केवळ युद्धच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमधील (FTA) बदलही मद्याच्या किमतीवर परिणाम करतात. भारत आणि ब्रिटनमध्ये सध्या मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू आहे, ज्यामुळे स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता या सवलतींच्या आड येऊ शकते.
advertisement
8/9
मद्यप्रेमींनी चिंता करावी का?बिशन कुमार यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, सध्या घाबरून जाण्याचे कारण नाही. भारतातील विदेशी दारूचा साठा सध्या पुरेसा आहे. पण, जर आखातातील तणाव निवळला नाही, तर येत्या काही महिन्यांत 'प्रीमियम लिकर'च्या बाटलीसाठी तुम्हाला खिशातून अधिक पैसे मोजावे लागू शकतात. हे सर्व काही समुद्री वाहतुकीच्या सुरक्षेवर आणि इंधनाच्या स्थिरतेवर अवलंबून असेल.
advertisement
9/9
थोडक्यात सांगायचे तर, दारूची निर्मिती जरी युद्धभूमीवर होत नसली, तरी ती ज्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचते, तो मार्ग मात्र युद्धाच्या छायेत आहे. त्यामुळे इंधन आणि गॅसपाठोपाठ मद्य क्षेत्रावरही युद्धाची सावली पडली आहे, हे निश्चित.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alcohol : गॅस सिलेंडर, तेल आणि इंधनाप्रमाणे दारु ही महाग होणार? की बाजारात विकणंच बंद होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल