खेड–दापोली मार्गावर भीषण अपघात; Wagonr आणि पिकअपची समोरासमोर धडक; कारचा चेंदामेंदा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Ratnagiri Accident: धडक इतकी जोरदार होती की पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात गेली.
advertisement
1/7

खेड–दापोली राज्य मार्गावर खेड शहरानजीक योगिता डेंटल कॉलेज परिसरात महिंद्रा पिकअप आणि वॅगनार कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लहान मुलासह एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून दापोली तालुक्यातील दाभोळ येथे फिरण्यासाठी एक कुटुंब वॅगनार कारमधून जात होते. दरम्यान खेड शहराजवळ योगिता डेंटल कॉलेज शेजारी समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीशी त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली.
advertisement
3/7
धडक इतकी जोरदार होती की पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात उतरली. दरम्यान वॅगनार कार नियंत्रण सुटून पुलाच्या संरक्षण कठड्याला अडकून राहिल्याने ती पलटी होण्यापासून वाचली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
4/7
या कारमध्ये लहान मुलासह चार प्रवासी आणि चालक होता. अपघातात सर्वजण जखमी झाले असून सुदैवाने जखमा किरकोळ असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
5/7
अपघातानंतर मार्गाने जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले आणि खेड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
advertisement
6/7
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
advertisement
7/7
गर्दीचा हा राज्य मार्ग असल्यामुळे या अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
खेड–दापोली मार्गावर भीषण अपघात; Wagonr आणि पिकअपची समोरासमोर धडक; कारचा चेंदामेंदा