TRENDING:

IPL 2026 : जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19व्या मोसमाला सुरूवात होणार आहे, तर 31 मे रोजी आयपीएलची फायनल होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बंगळुरू : आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19व्या मोसमाला सुरूवात होणार आहे, तर 31 मे रोजी आयपीएलची फायनल होईल, पण सध्या फक्त 12 मार्चपर्यंतच्याच सामन्यांची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांमुळे फक्त 12 एप्रिलपर्यंतच्याच सामने जाहीर करण्यात आले आहेत.
जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!
जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!
advertisement

आयपीएल 2026 चा पहिला सामना गतविजेती आरसीबी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी त्यांचं घरचं मैदान असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळेल का नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली होती, कारण आयपीएल 2025 च्या व्हिक्ट्री परेडवेळी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली.

आयपीएल 2025 मध्ये आरसीबी पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली होती. यानंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, यासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 50 जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीनंतर बंगळुरूमध्ये एकाही सामन्याचं आयोजन केलं गेलं नाही.

advertisement

सामना क्रमांक ठिकाण संघ तारीख वेळ
1 बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs सनरायझर्स हैदराबाद शनिवार, 28 मार्च 7:30 PM
2 मुंबई मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स रविवार, 29 मार्च 7:30 PM
3 गुवाहाटी राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स सोमवार, 30 मार्च 7:30 PM
4 न्यू चंदीगड पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स मंगळवार, 31 मार्च 7:30 PM
5 लखनऊ लखनऊ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स बुधवार, 1 एप्रिल 7:30 PM
6 कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद गुरुवार, 2 एप्रिल 7:30 PM
7 चेन्नई चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स शुक्रवार, 3 एप्रिल 7:30 PM
8 दिल्ली दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स शनिवार, 4 एप्रिल 3:30 PM
9 अहमदाबाद गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स शनिवार, 4 एप्रिल 7:30 PM
10 हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद vs लखनऊ सुपर जायंट्स रविवार, 5 एप्रिल 3:30 PM
11 बेंगळुरू RCB vs चेन्नई सुपर किंग्स रविवार, 5 एप्रिल 7:30 PM
12 कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स सोमवार, 6 एप्रिल 7:30 PM
13 गुवाहाटी राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स मंगळवार, 7 एप्रिल 7:30 PM
14 दिल्ली दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स बुधवार, 8 एप्रिल 7:30 PM
15 कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स vs लखनऊ सुपर जायंट्स गुरुवार, 9 एप्रिल 7:30 PM
16 गुवाहाटी राजस्थान रॉयल्स vs RCB शुक्रवार, 10 एप्रिल 7:30 PM
17 न्यू चंदीगड पंजाब किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद शनिवार, 11 एप्रिल 3:30 PM
18 चेन्नई चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स शनिवार, 11 एप्रिल 7:30 PM
19 लखनऊ लखनऊ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स रविवार, 12 एप्रिल 3:30 PM
20 मुंबई मुंबई इंडियन्स vs RCB रविवार, 12 एप्रिल 7:30 PM

advertisement

सुरक्षेच्या कारणामुळे बंगळुरूच्या प्रशासनाने चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने आयोजित करायला परवानगी दिली नव्हती. अखेर सुरक्षेचे सगळे नियम पाळल्यानंतर बंगळुरूच्या प्रशासनाने आयपीएल 2026 चे सामने बंगळुरूमध्ये आयोजित करायला परवानगी दिली आहे.

आरसीबीची टीम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इस्त्रायल-इराण युद्धाचा इंटरनेटला फटका? भारतातील डिजिटल सेवांवर काय होईल परिणाम?
सर्व पहा

रजत पाटीदार, विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, जॉश हेजलवूड, कृणाल पांड्या, टीम डेव्हिड, स्वप्नील सिंग, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथल, व्यंकटेश अय्यर, सात्विक ओत्सवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, जॉर्डन कॉक्स, रसिख दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, अभिनंदन सिंग, जेकब डफी, यश दयाळ

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : जिकडे 11 जणांचा मृत्यू झाला, तिथेच आयपीएलचा पहिला सामना, आयपीएलचं पूर्ण शेड्यूल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल