advertisement

इस्त्रायल-इराण युद्धाचा इंटरनेटला फटका? भारतातील डिजिटल सेवांवर काय होईल परिणाम?

Last Updated:

या केबल्समधूनच मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय इंटरनेट डेटा वाहतूक केली जाते. त्यामुळे या भागातील तणाव वाढल्यास किंवा केबल्सचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या इंटरनेट सेवांवर होऊ शकतो, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.

+
News18

News18

पुणे : आखातातील वाढत्या युद्धतणावामुळे जागतिक पातळीवर केवळ तेलपुरवठाच नव्हे तर इंटरनेटसारख्या अत्यावश्यक डिजिटल सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य पूर्वेतील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक इंटरनेट नेटवर्कसाठीही महत्त्वाची कडी आहे. या समुद्री मार्गाच्या तळाशी जगातील विविध देशांना जोडणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्सचे मोठे जाळे पसरलेले आहे. या केबल्समधूनच मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय इंटरनेट डेटा वाहतूक केली जाते. त्यामुळे या भागातील तणाव वाढल्यास किंवा केबल्सचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या इंटरनेट सेवांवर होऊ शकतो, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या आखातात वाढत असलेल्या युद्धतणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सामान्यतः ही सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, याच समुद्री मार्गाखाली जगभरातील इंटरनेट नेटवर्कसाठी अत्यावश्यक असलेल्या फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्यात आल्या आहेत. या केबल्समधूनच आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील देशांदरम्यान इंटरनेट डेटा मोठ्या प्रमाणात पाठवला जातो.
advertisement
भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटीही मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपकडे जाणाऱ्या या समुद्राखालील केबल्सवर अवलंबून आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी जवळपास एक तृतीयांश डेटा या मार्गातून जातो. त्यामुळे या परिसरात युद्ध किंवा लष्करी हालचाली वाढल्यास आणि त्यातून समुद्राखालील केबल्सचे नुकसान झाल्यास इंटरनेट सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
advertisement
सायबर तज्ज्ञांच्या मते, समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्स हे जागतिक इंटरनेट नेटवर्कचे कणा मानले जातात. या केबल्समध्ये कोणतेही नुकसान झाले तर इंटरनेटची गती कमी होणे, व्हिडिओ कॉलमध्ये अडथळे येणे, तसेच काही डिजिटल सेवा तात्पुरत्या खंडित होणे अशा समस्या उद्भवू शकतात. विशेषतः बँकिंग, फायनान्स, ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म यांसारख्या सेवांवर त्याचा परिणाम जाणवू शकतो.
advertisement
इंटरनेट तज्ज्ञ डॉ. निरंजन भुसनाळे यांच्या मते, इराण आणि भारत यांच्या दरम्यान समुद्राखाली अनेक ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यात आल्या आहेत. या केबल्स इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. युद्धस्थितीत जर या केबल्सना नुकसान झाले किंवा त्यांच्यावर हल्ला झाला, तर इंटरनेटची गती कमी होण्यासोबतच बँकिंग, फायनान्स आणि व्हिडिओ कम्युनिकेशनसारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
एकूणच, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढल्यास त्याचा परिणाम केवळ तेलपुरवठ्यावरच नव्हे तर इंटरनेटसारख्या अत्यावश्यक डिजिटल सेवांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील घडामोडींवर जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रासह अनेक देशांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
इस्त्रायल-इराण युद्धाचा इंटरनेटला फटका? भारतातील डिजिटल सेवांवर काय होईल परिणाम?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement