TRENDING:

Hansika Motwani Divorce: कोट्यवधींची संपत्ती, आलिशान बंगले अन्... हंसिका की सोहेल, दोघांमध्ये कोण आहे श्रीमंत?

Last Updated:
Hansika Motwani Divorce: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहेल कथुरिया यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करताच संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे.
advertisement
1/9
कोट्यवधींची संपत्ती, आलिशान बंगले अन्... हंसिका की सोहेल, दोघांमध्ये कोण आहे श्रीमंत?
मुंबई : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहेल कथुरिया यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करताच संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. वांद्रे येथील फॅमिली कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली असून काही तासांतच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.
advertisement
2/9
४ डिसेंबर २०२२ साली हंसिका आणि सोहेल यांनी लग्नगाठ बांधली, मात्र लग्नाच्या ३ वर्षांनीच त्यांनी घटस्फोट घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे सोहेलने हंसिकाला आयफेल टॉवरसमोर अतिशय रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं होतं, त्यामुळे या बातमीने सर्वांनाच शॉक दिला आहे.
advertisement
3/9
दरम्यान, हंसिकाने सोहेलकडून कोणतीही पोटगी घेण्यास नकार दिला आहे. यानंतर सोहेल आणि हंसिका यांच्या संपत्तीबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हंसिका आणि सोहेल यांची संपत्ती किती आहे आणि दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत आहे ते जाणून घेऊया.
advertisement
4/9
बालकलाकार म्हणून करिअर सुरू केलेल्या हंसिकाने आज स्वतःचं एक मोठं साम्राज्य उभं केलं आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिकाची एकूण संपत्ती सुमारे ३७ कोटी रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी ८० लाख ते १ कोटी रुपये मानधन घेते.
advertisement
5/9
ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसायातून तिला दरमहा ४० ते ५० लाख रुपयांची कमाई होते. तर, मुंबईतील अंधेरी वेस्ट परिसरात हंसिकाचा एक भव्य आणि आलिशान व्हिला आहे.
advertisement
6/9
जर गाड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर हंसिका कोणत्याही बड्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही. तिच्याकडे अशा काही गाड्या आहेत, ज्यांच्या किमती ऐकून तुम्हाला घाम फुटेल. तिच्याकडे असलेल्या रोल्स रॉयस फँटम (Rolls-Royce Phantom) ची किंमत तब्बल १० कोटी रुपये आहे.
advertisement
7/9
तर मर्सिडीज बेंज एस क्लासची किंमत २.१७ कोटी रुपये इतकी असून बीएमडब्ल्यू ६ सीरीज जीटी ७५.५० लाख रुपयांची आहे. इतकंच नाही, तर तिच्या गॅरेजमध्ये जग्वार एक्सई, बीएमडब्ल्यू ५ सीरीज आणि मर्सिडीज बेंज ई क्लास यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
8/9
दुसरीकडे सोहेल कथुरिया हा एक यशस्वी उद्योजक आहे. त्याचा व्यवसाय भारत आणि परदेशात पसरलेला आहे. सोहेलची एकूण संपत्ती अंदाजे २५ कोटी रुपये आहे. तो मुंबईतील आपल्या कौटुंबिक व्यवसायाव्यतिरिक्त इव्हेंट मॅनेजमेंट आणि 'अवांत टेक्सवर्ल्ड' या कपड्यांच्या ब्रँडचा मालक आहे.
advertisement
9/9
सोहेलने हंसिकासोबत 'हंसिका मोटवानी इव्हेंट्स एलएलपी' ही कंपनीही स्थापन केली होती. तो हंसिकापेक्षा आर्थिकदृष्ट्या थोडा मागे असला, तरी व्यावसायिक वर्तुळात त्याचं मोठं नाव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hansika Motwani Divorce: कोट्यवधींची संपत्ती, आलिशान बंगले अन्... हंसिका की सोहेल, दोघांमध्ये कोण आहे श्रीमंत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल