TRENDING:

Gas Saving Tips : अचानक गॅस संपला तर..? 'या' ट्रिक्स वापरून करा बचत, नेहमीपेक्षा काही दिवस जास्तच चालेल!

Last Updated:
How to save gas from home cylinder : अचानक घरातील गॅस संपला तर खूप त्रास होतो. आता तर गॅस लवकर मिळेल की नाही, याचीच सर्वांना चिंता आहे. सरकारने याबद्दल काळजी करू नये, असं आश्वासन दिलेलं असलं, तरी आपण मात्र खबरदार राहणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक करताना गॅस कसा वाचवायचा याबद्दल महिती देत आहोत.
advertisement
1/7
अचानक गॅस संपला तर..? 'या' ट्रिक्स वापरून करा बचत, नेहमीपेक्षा जास्तच दिवस चालेल
काही सोप्या टिप्स आणि काही नियम फॉलो करून तुम्ही घरातील गॅसची बचत करू शकता. यामुळं तुम्हाला गॅसची चिंता करण्याची गरज पडणार नाही. चला तर मग पाहूया गॅस वाचवण्याच्या काही टिप्स.
advertisement
2/7
सर्वात आधी तर गॅस सिलेंडरमध्ये गॅसची कुठे गळती तर होत नाही ना, हे तपासा. पाईप किंवा रेग्युलेटरमध्ये गळती झाल्यामुळे कालांतराने गॅस कमी होऊ शकतो. यामुळे गॅस वाया जातो आणि तुमच्या बजेटवर ताण येतो.
advertisement
3/7
गॅस वाचवण्यासाठी तुम्ही पातेले किंवा पण ऐवजी कुकरचा वापर करू शकता. प्रेशर कुकर वापरल्याने अन्न लवकर शिजतं आणि गॅस खूप कमी वापरला जातो. म्हणून फक्त भात किंवा खिचडीसाठीच नाही तर तुम्ही भाजीसाठीही कुकर वापरू शकता.
advertisement
4/7
त्याचप्रमाणे अन्न गरम करण्यासाठी फ्रिजमधून काढून थेट स्टोव्हवर ठेऊ नका.या कारण असे थंड भांडे गॅसवर ठेवल्यानंतर त्याला गरम होण्यासाठी खूप गॅस आणि वेळही लागतो. म्हणून ते आधी रूम टेम्परेचरवर नॉर्मल होऊ द्या आणि मग गॅसवर ठेवा.
advertisement
5/7
तसेच गॅसवर ओली भांडी ठेऊ नका. कारण ओली भांडी गरम होण्यासाठी खूप गॅस आणि वेळ खातात. म्हणून भांडी व्यवस्थजित कोरडी करून गॅसवर ठेवा आणि स्वयंपाक करा.
advertisement
6/7
गॅसची बचत करण्यासाठी मध्यम आचेवर स्वयंपाक करा. हा उत्तम पर्याय आहे. कारण त्यामुळे गॅस जास्त वापरला जात नाही आणि वयही जात नाही.
advertisement
7/7
यासोबतच गॅसची नियमित तपासणी कारणंही महत्त्वाचं आहे. गॅसची गळती रोखण्यासाठी नियमितपणे तुमचे गॅस पाईप, रेग्युलेटर आणि सिलेंडर तपासण्याची सवय लावा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Gas Saving Tips : अचानक गॅस संपला तर..? 'या' ट्रिक्स वापरून करा बचत, नेहमीपेक्षा काही दिवस जास्तच चालेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल