TRENDING:

मी आनंदी नव्हतो, प्रेम हवं! लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफने करीनाशी नात्याबाबतची सगळी सीक्रेट उलगडली

Last Updated:
Saif Ali Khan Kareena Kapoor : सैफ अली खान आणि करीना कपूर बॉलिवूडमधील फेमस कपल्सपैकी एक. सैफने पहिल्यांदाच त्यांच्या नात्यातील सीक्रेट सगळ्यांसमोर उलगडलं आहे.
advertisement
1/7
मी आनंदी नव्हतो, प्रेम हवं! सैफने करीनाशी नात्याबाबतची सगळी सीक्रेट उलगडली
सैफ अली खान आणि करीना कपूर हे बी-टाउनमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचं लग्न झालं. त्यांना आता तैमूर आणि जहांगीर किंवा जेह अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या लग्नाला आता 13 वर्षे उलटून गेली आहेत. करीनाशी लग्नानंतर इतक्या वर्षांनी सैफ अली खान रिलेशनशिपबाबत आपलं मन मोकळं केलं आहे.
advertisement
2/7
सैफ अली खानने अलीकडेच बहीण सोहा अली खानच्या पॉडकास्टवर करीना कपूर खानसोबतच्या त्याच्या 13 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक गुपितं उलगडली आहेत. सैफने लग्न, असुरक्षितता आणि मुलं झाल्यानंतरचं रिलेशन याबाबत सगळं स्पष्टपणे सांगितलं.
advertisement
3/7
सैफ म्हणाला की, नातेसंबंधांमध्ये असुरक्षितता सामान्य आहे. विशेषतः जेव्हा दोघंही फिल्म इंडस्ट्रीत असतात आणि इतर कलाकारांसोबत काम करतात. कधीकधी असुरक्षितता दुसऱ्या व्यक्तीमुळे नसून स्वतःच्या विचारसरणीमुळे निर्माण होते. अशा परिस्थितीत, विश्वास आणि परस्पर आश्वासन अत्यंत महत्त्वाचं असतं.
advertisement
4/7
सैफने कबूल केलं की कधीकधी तो थोडा भावनिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. पण त्यांच्यातील प्रेम आणि समजुतीमुळे त्यांचं नातं फुलतं. तो म्हणाला, "अनेकदा वैयक्तिक असुरक्षितता बालपणीच्या अनुभवांमधून येते.  नातेसंबंधात कधीकधी तुमचा पार्टनर या समस्यांना तोंड देण्यास मदत करतो. नात्यात स्वातंत्र्य महत्त्वाचं असलं तरी प्रेम आणि काळजी हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लग्न हे फक्त दोन लोक एकत्र राहणं नसावं, तर त्यांच्यात जवळीक एक खास बंधनही असायला हवं"
advertisement
5/7
सैफने मुलं झाल्यानंतर नातेसंबंधांमध्ये होणाऱ्या बदलांबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, "मुलं झाल्यानंतर अनेक जोडप्यांचं नातं बदलतं आणि कधीकधी ते कठीणही बनतं.  अशावेळी लग्न यशस्वी करण्यासाठी अनेकदा नशीब लागतं. दोन्ही लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे समान गोष्टी असाव्यात यासाठी तुम्ही भाग्यवान असलं पाहिजे. त्याच्यात आणि करीनामध्ये चांगला समतोल असल्याचं त्याने सांगितलं. त्या दोघांचं स्वत:चं काम आणि स्वत:ची स्पेस आहे. पण काही गोष्टी त्यांना एकत्र आणतात. ते एकत्र वेळ घालवतात आणि अनुभव शेअर करतात"
advertisement
6/7
"कोणत्याही नात्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. जर नात्यात समस्या उद्भवल्या तर त्या समजून आणि संवादाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे", असं तो म्हणाला.
advertisement
7/7
सैफ म्हणाला, पूर्वी तो इतका स्थिर किंवा आनंदी नव्हता पण आता  परिस्थिती बदलली आहे. तो आज एका स्थिर आणि आनंदी नात्यात आहे. याबद्दल तो स्वतःला खूप भाग्यवान मानतो. त्याचा स्वतःचा आणि करीनाचा समजूतदारपणा आणि तिचा दयाळूपणा यामुळे त्यांचं नातं मजबूत झाल्याचं त्याने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मी आनंदी नव्हतो, प्रेम हवं! लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफने करीनाशी नात्याबाबतची सगळी सीक्रेट उलगडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल