TRENDING:

Instagram Down: इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन! रिल्स अडकले, फोटोही अपलोड होईना, युझर्सचा संताप

Last Updated:
रिल्स लोड करण्यात अडचण येत आहे.डाऊनडिटेक्टर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९:१५ मिनिटांच्या आसपास या तक्रारी सुरू झाल्या.
advertisement
1/6
इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन! रिल्स अडकले, फोटोही अपलोड होईना, युझर्सचा संताप
इन्स्टावर रिल लोड होत नाही, किंवा तुम्हाला एखादा व्हिडीओ नीट पाहता येत नाही किंवा अपलोडसाठी प्रॉब्लेम येत आहे का? तर हा तुमच्या फोनचा प्रॉब्लेम नाही तर इन्स्टाग्रामचा सर्व्हर डाऊन झाला आहे. सकाळपासूनच युझर्सला अनेक अडचणी येत आहेत.
advertisement
2/6
इंस्टाग्राममध्ये काहीतरी मोठा तांत्रिक बिघाड झाला असून, जगभरातील हजारो युजर्सना हे ॲप वापरताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळपासूनच अनेकांना आपल्या मित्र-मैत्रिणीच्या स्टोरीज, स्टेटस बघण्यात अडचण येत आहे.
advertisement
3/6
काहींना रिल्स लोड करण्यात अडचण येत आहे.डाऊनडिटेक्टर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९:१५ मिनिटांच्या आसपास या तक्रारी सुरू झाल्या. अचानक १२,००० हून अधिक युजर्सनी ॲप चालत नसल्याचं सांगितलं. यातल्या ७४% लोकांची तक्रार ही चक्क ॲप लोड न होण्याबाबत आहे.
advertisement
4/6
इन्स्टा बंद पडल्याबरोबर नेहमीप्रमाणे युजर्सनी ट्विटर करून याबाबत माहिती दिली. माझं इंटरनेट संपलं की इन्स्टाच बंद आहे? अशा प्रश्नांचा पाऊस सोशल मीडियावर पडला. अनेकांनी ॲप रिस्टार्ट केलं, फोन बंद करून चालू केला, पण तरीही फीड लोड होत नाही असंही सांगितलं.
advertisement
5/6
१८% युजर्सना सर्व्हरशी संपर्कच साधता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, इंस्टाग्राम किंवा त्यांच्या मालकीच्या मेटा कंपनीने या तांत्रिक बिघाडाबाबत अजून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.
advertisement
6/6
हा बिघाड सर्व्हर अपडेटमुळे आहे की काही तांत्रिक त्रुटीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सेवा पूर्ववत होण्यासाठी काम सुरू असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर मात्र युजर्स यावरून चर्चा करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Instagram Down: इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन! रिल्स अडकले, फोटोही अपलोड होईना, युझर्सचा संताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल