TRENDING:

“एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील,” डॉक्टर तरुणीनं चिठ्ठी लिहिली अन्..., मुंबईत भयंकर घडलं

Last Updated:

Mumbai Crime: डॉ. स्तुती या एमडीएसच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांची आणि फजल खानची ओळख एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून झाली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तिच्या मित्राला अटक केली. डॉ. स्तुती बजरंग सोनावणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली फजल मोहम्मद खान (31) याला मंगळवारी लोअर परळ येथून अटक करण्यात आली. अँटॉप हिल पोलिसांनी ही कारवाई केली असून न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
“एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील,” डॉक्टर तरुणीनं चिठ्ठी लिहिली अन्..., मुंबईत भयंकर घडलं
“एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील,” डॉक्टर तरुणीनं चिठ्ठी लिहिली अन्..., मुंबईत भयंकर घडलं
advertisement

डॉ. स्तुती यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना त्यांच्या खोलीतून सहा पानी सुसाईड नोट मिळाली असून ती त्यांच्या हस्ताक्षरात असल्याचे सांगितले जात आहे. या पत्रात त्यांनी फजल खान याच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. सतत अपमानास्पद बोलणे, चारित्र्यावर शंका घेणे आणि दुखावणाऱ्या टिप्पणींमुळे आपण मानसिकदृष्ट्या खचल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

advertisement

लग्न होईना; मुलाचं डोकं फिरलं, लोखंडी पाईप घेतला अन् वडिलांनाच संपवलं, सोलापूर हादरलं!

सुसाईड नोटमध्ये आणखी एक धक्कादायक उल्लेखही आहे. स्तुतीच्या काही मैत्रिणींना फजलच्या वागणुकीची माहिती होती. त्या त्याच्या त्रासामुळे तिला चिडवत “एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील” असे म्हणत असल्याचेही पत्रात लिहिलेले आढळले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. स्तुती या एमडीएसच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांची आणि फजल खानची ओळख एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. गेल्या सुमारे एका वर्षापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र या काळात खानकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप समोर आला आहे.

advertisement

ही घटना 8 मार्च रोजी उघडकीस आली. त्या दिवशी संध्याकाळी स्तुतीचे आई-वडील जेवणासाठी बाहेर गेले होते. रात्री परतल्यानंतर ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता स्तुतीने ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, शवविच्छेदन अहवालातही गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
“एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील,” डॉक्टर तरुणीनं चिठ्ठी लिहिली अन्..., मुंबईत भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल