धनसंपत्तीपासून विवाहापर्यंत, 'या' खास रुद्राक्षाचे फायदे वाचून व्हाल हैराण
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
रुद्राक्षाला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध रुद्राक्षाचे विविध फायदे असतात. रुद्राक्ष परिधान करणं म्हणजे आजारपणांपासून स्वतःचं रक्षण करणं, इतकं त्याला आयुर्वेदातही महत्त्व आहे. मात्र त्यातही गौरी शंकर रुद्राक्ष विशेष मानलं जातं.
advertisement
1/5

इंदोरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कपिल महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी शंकर रुद्राक्ष चमत्कारिक मानलं जातं कारण त्यात साक्षात देवी पार्वती आणि महादेवांचा वास असतो. (फोटो सौजन्य : गुगल)
advertisement
2/5
मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी हे रुद्राक्ष परिधान करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. शिवाय यामुळे लग्नही लवकर जुळतं. (फोटो सौजन्य : गुगल
advertisement
3/5
आर्थिक संकटांशी सामना करणाऱ्या व्यक्तींसाठीही गौरी शंकर रुद्राक्ष लाभदायी ठरतं. तसंच शिक्षणात या रुद्राक्षाचे चमत्कार पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य : गुगल)
advertisement
4/5
वैवाहिक दाम्पत्याचं वाईट नजरांपासून संरक्षण करण्यासाठी हे रुद्राक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. शिवाय ते परिधान केल्यास पती-पत्नीमध्ये प्रेम वाढतं आणि आयुष्यात शांतता येते. (फोटो सौजन्य : गुगल)
advertisement
5/5
गौरी शंकर रुद्राक्ष परिधान करण्यासाठी एक विशिष्ट मंत्र आहे. ज्योतिषांनी सांगितल्यानुसार, ओम गौरीशंकराय नमः या मंत्राचा जप करत रुद्राक्ष परिधान केल्यास सर्व अडलेली कामं पूर्ण होतात. (फोटो सौजन्य : गुगल)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
धनसंपत्तीपासून विवाहापर्यंत, 'या' खास रुद्राक्षाचे फायदे वाचून व्हाल हैराण