TRENDING:

Madhuri Dixit Song : माधुरी दीक्षितचं आयकॉनिक गाणं! फक्त एका आठवड्यात विकल्या गेल्या 1 कोटी कॅसेट्स, बम्पर कमाई

Last Updated:
Madhuri Dixit Song : माधुरी दीक्षितचं नव्वदच्या दशकातील त्या फिल्ममधील ते गाणं आजही कित्येक ठिकाणी वाजतं आणि लोक ते आवडीने ऐकतात.
advertisement
1/7
माधुरी दीक्षितचं आयकॉनिक गाणं! फक्त एका आठवड्यात विकल्या गेल्या 1 कोटी कॅसेट्स, बम्पर कमाई
90 च्या दशकातील अनेक फिल्म्स, गाणी, हिरो, हिरोईन ज्यांना आजही प्रेक्षक विसरले नाहीत. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. जिची बरीच गाणी आजही लोकांच्या लक्षात आहेत. पण एक गाणं जरा जास्तच. तुम्हाला विश्वास बसणार नाही. माधुरीचं ते एक आयकॉनिक गाणं, जे इतकं हिट झालं की या गाण्याच्या 7 दिवसांत 1 कोटी कॅसेट्स विकल्या गेल्याचा माहिती आहे.
advertisement
2/7
90 च्या दशकातील हे गाणं लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने संगीतबद्ध केलेलं. त्यांनी असं अजरामर गाणं तयार केलं जे आजही लग्न, पार्ट्या आणि समारंभांमध्ये ऐकलं जातं. हे गाणं आजही बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या हिट गाण्यांपैकी एक आहे. तो चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला.
advertisement
3/7
या संगीतकार जोडीने हे गाणं रागाच्या भरात संगीतबद्ध केलं होतं. अनेक फिल्ममध्ये संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत काम केलेले संगीत दिग्दर्शक अमर हळदीपूर यांनी एका मुलाखतीत या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला.
advertisement
4/7
हळदीपूरम्हणाले, "लक्ष्मीकांत-प्यारेलाल गाणं सुरू होण्यापूर्वी बासरी, मँडोलिन, पियानो आणि सुंदरीवर एक खास धून वाजवायचे. गायक गायचा पण ती धूनच त्यांची ओळख बनून जायची. या गाण्यातही त्यांनी धून वाजवली जी सगळ्यांच्या लक्षात राहिली. पण ही धून तयार करताना प्यारेलाल खूप रागात होते."
advertisement
5/7
"खरं तर सनई वादकाला ही धून वाजवता येत नव्हती. प्यारेलालजींनी ती धून अनेक प्रकारे वाजवून पाहिली, पण सनई वादकाला ती वाजवता आली नाही. त्यांना राग आला आणि त्यांनी त्याचा एक छोटासा भाग वाजवून घेतला. गाण्यात ऐकू येणारी धून प्यारेलाल यांनी रागाच्या भरात रचली होती. त्यांनी ती धून सोपी करून सनई वादकाला दिली. ते सर्वात मोठे हिट गाणं ठरलं, असं हळदीपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
6/7
गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेलं हे गाणं. अलका याज्ञिक यांनी गायलं आहे. ते इतकं लोकप्रिय झालं की एका आठवड्यात  त्याच्या 1 कोटी ऑडीओ कॅसेट्स विकल्या गेल्या. या गाण्याची एक पुरुष आवृत्तीही प्रदर्शित झाली आणि फिल्ममधील हिरोने त्याच्यावर डान्स केला.
advertisement
7/7
6 ऑगस्ट 1993 रोजी प्रदर्शित झालेली ही फिल्म, ब्लॉकबस्टर ठरली होती. या फिल्मने तेव्हा 24 कोटींची कमाई केली होती. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट होता. फिल्म आहे खलनायक आणि ते गाणं आहे चोली के पीछे क्या है. या गाण्याची धून इतकी खास आहे की ती वाजताच हे गाणं लागलं आहे, हे लक्षात येतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit Song : माधुरी दीक्षितचं आयकॉनिक गाणं! फक्त एका आठवड्यात विकल्या गेल्या 1 कोटी कॅसेट्स, बम्पर कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल