TRENDING:

Makar Sankranti 2025: यंदाच्या मकर संक्रांतीला खरंच घालायचे नाहीत पिवळे कपडे? नेमकं कारण तरी काय?

Last Updated:
अनेकजण मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालतात. तर काहीजण रंगीबेरंगी नवीन कपडे परिधान करतात. परंतु यंदाच्या संक्रांतीला मात्र पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये, असं म्हटलं जातंय. यामागे नेमकं कारण काय, जाणून घेऊया.
advertisement
1/5
यंदाच्या मकर संक्रांतीला खरंच घालायचे नाहीत पिवळे कपडे? नेमकं कारण तरी काय?
मकर संक्रांत म्हणजे वर्षातला पहिला सण. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह वेळोवेळी राशीप्रवेश करतात. जेव्हा सूर्य ग्रहाचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा साजरी होते मकर संक्रांत.
advertisement
2/5
संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू बनविण्याची परंपरा आहे. हे लाडू एकमेकांना देऊन ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’, असं म्हटलं जातं. तसंच पतंग उडवून हा सण साजरा केला जातो.
advertisement
3/5
भारताच्या विविध भागांमध्ये या सणाला विविध नावांनी ओळखलं जातं. दक्षिण भारतात म्हणतात पोंगल, उत्तरेकडे म्हणतात लोहरी, तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा होतो.
advertisement
4/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा संक्रांती देवीनं पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. त्यामुळे 2025च्या मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य असेल. दरम्यान, थंडीच्या दिवसांमध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी काळे कपडे घातले जातात. त्यामुळे मकर संक्रांतीलाही काळेच कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. तसंच थंडीमुळेच या दिवशी शीत रंगाचे कपडे घालत नाहीत, असं म्हटलं जातं. अन्यथा सणावारानिमित्त प्रत्येकाने आपापल्या आवडीचे कपडे परिधान करावे.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Makar Sankranti 2025: यंदाच्या मकर संक्रांतीला खरंच घालायचे नाहीत पिवळे कपडे? नेमकं कारण तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल