IND vs ZIM : सेमी फायनलची वाट बिकट, तरी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष, नेमकं चाललंय काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा सेमी फानयलमध्ये पोहोचणे खूपच अवघड आहे.त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. असे असतानाच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचा जल्लोष सूरू आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकप 2026 च्या सुपर 8 सामन्यात साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी पराभव केला होता.या पराभवानंतर टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची वाट खूपच बिकट झाली होती.
advertisement
2/7
कारण आता टीम इंडियाला त्यांचे उरलेले झिम्बाबे आणि वेस्टइंडीज विरूद्धचे दोनही सामने मोठ्या फरकाने जिंकाले लागणार आहेत. या दरम्यान त्यांना खासकरून नेटरनरेटवर लक्ष्य ठेवावे लागणा आहे.
advertisement
3/7
कारण नेटरनरेटवर टीम इंडियाचा सेमी फानयलमध्ये पोहोचणे अवलंबून आहे. पण हे खूपच अवघड आहे.त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. असे असतानाच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचा जल्लोष सूरू आहे.
advertisement
4/7
कारण टीम इंडियाचा मॅचविनर पुन्हा मैदानात परतला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि ते जल्लोष करतायत.
advertisement
5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा ऑलराऊंडर रिंकु सिंग आहे. रिंकु सिंगने मंगळवारी प्रॅक्टीस सेशन सोडून आपल्या घरी परतला होता.त्यामुळे तो कदाचित वर्ल्डकपच्या उर्वरीत सामन्यांना मुकेल असे वाटत होते.
advertisement
6/7
रिंकुच्या वडिलांचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचल्याचे वृत्त होते. त्यामुळे त्याला घरी परतावे लागले होते. पण आता टीम इंडियाचा बॅटींग कोच सितांशु कोटकने तो पुन्हा टीम इंडियात सामील होणार असल्याची माहिती दिली आहे.
advertisement
7/7
रिंकूचे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खेळणं आता जवळपास अशक्य मानलं जात आहे. रिंकूच्या जागी प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं असून संघ व्यवस्थापन आता पर्यायांचा गांभीर्याने विचार करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ZIM : सेमी फायनलची वाट बिकट, तरी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष, नेमकं चाललंय काय?