KKR vs PBKS : पावसामुळे मॅचही गमावली पण केकेआरला होणार 18 कोटींचा फायदा, शाहरूखला कोलकात्यातच मिळाली गुड न्यूज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
KKR Matheesha Pathirana Back In Nets : केकेआरला मॅच जिंकता आली पण त्यांना गुड न्यूज नक्कीच मिळाली आहे. आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी श्रीलंकेतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
advertisement
1/7

पंजाब किंग्ज आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात रोमांचक सामना ईडन गार्डन्सवर होणार होता. पण पावसामुळे सामना अखेर रद्द करावा लागला. ज्यामुळे दोन्ही संघाना 1-1 गुण मिळाले.
advertisement
2/7
केकेआरला मॅच जिंकता आली पण त्यांना गुड न्यूज नक्कीच मिळाली आहे. आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी श्रीलंकेतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
advertisement
3/7
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना आता दुखापतीतून सावरत असून त्याने नेटमध्ये बॉलिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या प्रगतीमुळे केकेआरच्या गोटात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
advertisement
4/7
किंग खानला देखील कोलकात्यात याची माहिती दिली गेली. दुखापतीमुळे पथिरानाचा आयपीएल 2026 मधील सहभाग अनिश्चित मानला जात होता. टी20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान पथिरानाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.
advertisement
5/7
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे केकेआरच्या सुरुवातीच्या मॅचेसमध्ये तो खेळू शकला नाही. मात्र, आता त्याने पुन्हा सराव सुरू केल्याने तो लवकरच मैदानात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
6/7
केकेआरने लिलावात 18 कोटी रुपयांची मोठी बोली लावून पथिरानाला आपल्या संघात सामील करून घेतले होते. तो श्रीलंकेचा आतापर्यंतचा सर्वात महागडा आयपीएल खेळाडू ठरला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, केकेआरची सर्वात मोठी अडचण म्हणजे बॉलिंग अटॅक... अशातच पथिराना पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे फिट होऊन निवडीसाठी उपलब्ध होऊ शकतो, असं समजतंय. त्यामुळे केकेआरला याचा फायदाच होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
KKR vs PBKS : पावसामुळे मॅचही गमावली पण केकेआरला होणार 18 कोटींचा फायदा, शाहरूखला कोलकात्यातच मिळाली गुड न्यूज!