TRENDING:

IND vs SA : पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा, प्लेइंग इलेव्हनमधून तिघांना डच्चू

Last Updated:
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 111 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 76 धावांनी हारला आहे.
advertisement
1/7
पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा, प्लेइंग इलेव्हनमधून तिघांना
सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
2/7
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 111 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 76 धावांनी हारला आहे.
advertisement
3/7
टीम इंडियाच्या या वर्ल्ड कपमधील पहिल्याच पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा पसरला आहे. याचा अर्थ टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आता काही बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
खरं तर टीम इंडियाच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. बॅटींग आणि बॉलिंग दोन्ही विभागात भारत आज फ्लॉप ठरला होता.भारताच्या या कामगिरीनंतर आता तीन खेळाडूंना डच्चू मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
5/7
पहिला खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा मागच्या तीन सामन्यापासून शुन्यावर बाद होत होता.आज त्याला स्वत:ला सिद्ध करायची संधी होती. पण आज देखील तो 15 धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे त्याचा सततची ही खराब कामगिरी पाहता त्याच्या जागी संजू सॅमसनला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
दुसरा खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा अर्शदिप सिंह आहे. अर्शदिप सिंहने 4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या.त्याने चांगली कामगिरी केली. पण पुढील सामन्यांचे समीकरण पाहता कुलदीप यादवला संघा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
आफ्रिकेविरूद्ध सामन्यात अक्षर पटेला बाहेर बसवून वॉशिंग्टन सुंदरला संघात घेऊन सूर्याने मोठी चूक केली. कारण वॉशिंग्टन सुंदर 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. त्यानंतर तो फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही आणि 11 धावांवर बाद झाला.त्यामुळे अक्षरला पुन्हा संघात संधी दिली जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सन्नाटा, प्लेइंग इलेव्हनमधून तिघांना डच्चू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल