Smriti Mandhana : 'आय होप दिस इस माय लास्ट...', 10000 रन्सचा इतिहास रचल्यावर स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, काय म्हणाली?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana On Achievement : भारताची स्फोटक फलंदाज स्मृती मानधनाने तिच्या 281 व्या आंतरराष्ट्रीय डावात 10,000 धावा पूर्ण केल्या, जे महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद आहे. त्यामुळे स्मृतीचं सध्या कौतूक केलं जातंय.
advertisement
1/7

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. महिला क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी ती सर्वात जलद क्रिकेटपटू ठरली.
advertisement
2/7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी स्मृती मानधन दुसरी भारतीय आणि जगातील चौथी महिला खेळाडू ठरली आहे. मिताली राज 10,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू होती.
advertisement
3/7
इतिहास रचल्यानंतर स्मृतीने मोठं वक्तव्य केलं. आय होप दिस इस माय लास्ट इंटरव्हूय ऑफ द इयर, असं म्हणत स्मृतीने मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. मला असं वाटतं की, प्रत्येकाला दररोज शुन्यातून सुरूवात करावी लागते, असं स्मृती म्हणाली.
advertisement
4/7
तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळं प्रेशर असतं. टी-ट्वेंटीमध्ये तुम्हाला जास्त हार्ड रहावं लागतं. वनडे आणि टेस्टमध्ये वेळ मिळतो. पण टी-ट्वेंटी फॉरमॅट वेगळा आहे. पण वनडे वर्ल्ड कप सगळ्या खेळाडूंसाठी वेगळा अनुभव होता, असं स्मृती मानधना म्हणाली.
advertisement
5/7
आता तुम्ही वर्ल्ड कप जिंकला पण पुढील वर्ल्ड कपविषयी देखील विचार करावा लागतो. मी सध्या माझ्या खेळावर पूर्णपणे खूश नाहीये. पण येत्या काळात मी माझा गेम सुधारावेल, असं स्मृती म्हणाली.
advertisement
6/7
प्रेक्षकांच्या दुवाओसे हमारी दुकान चलती है, इंडियन्स फॅन्सने आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. मला आशा आहे की सगळे फॅन्स आमच्यावर प्रेम करतील, असा विश्वास देखील स्मृतीने यावेळी व्यक्त केला.
advertisement
7/7
दरम्यान, भारताची स्फोटक फलंदाज स्मृती मानधनाने तिच्या 281 व्या आंतरराष्ट्रीय डावात 10,000 धावा पूर्ण केल्या, जे महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद आहे. त्यामुळे स्मृतीचं सध्या कौतूक केलं जातंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : 'आय होप दिस इस माय लास्ट...', 10000 रन्सचा इतिहास रचल्यावर स्मृती मानधनाने घेतला मोठा निर्णय, काय म्हणाली?