TRENDING:

झिम्बाब्वेकडून हरले, पण ऑस्ट्रेलियाची मस्ती जाईना... हेडने टीम इंडियाला डिवचलं!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मोठा उलटफेर केला आहे. कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेचा 23 रननी विजय झाला.
advertisement
1/7
झिम्बाब्वेकडून हरले, पण ऑस्ट्रेलियाची मस्ती जाईना... हेडने टीम इंडियाला डिवचलं!
पहिले बॅटिंग करणाऱ्या झिम्बाब्वेने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 169 रन केले. 170 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा 19.3 ओव्हरमध्ये 146 रनवर ऑलआऊट झाला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियासमोर ग्रुप स्टेजलाच स्पर्धेबाहेर जायचा धोका निर्माण झाला आहे.
advertisement
2/7
झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा काळजीवाहू कर्णधार ट्रॅविस हेडने भारतीय टीमला डिवचलं आहे. आणखी एक पराभव झाला तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल, असं ट्रॅविस हेडला विचारण्यात आलं.
advertisement
3/7
या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने 2023 वर्ल्ड कपची आठवण करून दिली. 2023 च्या वर्ल्ड कपमध्येही आमचा काही सामन्यांमध्ये पराभव झाला होता, तसंच तेव्हाही आम्हाला दुखापतींनी सतावलं होतं. 2023 वर्ल्ड कप खेळलेले खेळाडूही या टीममध्ये आहेत, असं हेड म्हणाला.
advertisement
4/7
आमच्याकडे असे खेळाडू आहेत, जे 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतामध्ये खेळले होते. आम्ही या परिस्थितीतून मार्ग काढू आणि त्याच ब्लू प्रिंटचा वापर करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया हेडने दिली आहे.
advertisement
5/7
2023 च्या वर्ल्ड कपचा उल्लेख करून ट्रेविस हेडने टीम इंडिया आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या कटू आठवणी जाग्या केल्या. 2023 वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाला पराभव आणि दुखापतींनी ग्रासलं होतं.
advertisement
6/7
2023 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत होती, पण ग्लेन मॅक्सवेलने वानखेडे स्टेडियमवर एका पायाने द्विशतक झळकवून ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
advertisement
7/7
सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. ट्रेविस हेडने भारताविरुद्धच्या फायनलमध्ये झुंजार शतक करून ऑस्ट्रेलियाला आणखी एक वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळवून दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
झिम्बाब्वेकडून हरले, पण ऑस्ट्रेलियाची मस्ती जाईना... हेडने टीम इंडियाला डिवचलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल