IND vs PAK : भरवसा ठेवला त्यानेच दगा दिला... टीम इंडियाच्या ओपनरचा नेहरापेक्षा वाईट विक्रम!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानी कर्णधाराने त्याचा स्वत:चा हा निर्णय योग्य ठरवला.
advertisement
1/6

मॅचची पहिलीच ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार सलमान आघा स्वत: आला आणि त्याने ओव्हरच्या शेवटच्या बॉलला अभिषेक शर्माची विकेट घेतली. 4 बॉलमध्ये शून्य रन करून अभिषेक आऊट झाला.
advertisement
2/6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक भारताचं ट्रम्प कार्ड ठरेल, असं वाटत होतं, कारण आशिया कपमध्ये अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं होतं, पण यंदा मात्र अभिषेक अपयशी ठरला आहे.
advertisement
3/6
अभिषेक शर्माचा हा फॉर्म टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे, कारण टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक दोन सामने खेळला आहे आणि दोन्ही सामन्यांमध्ये तो शून्यवरच आऊट झाला आहे. युएसएविरुद्धच्या सामन्यात अभिषेक पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.
advertisement
4/6
नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी अभिषेक शर्मा आजारी पडला, त्यामुळे खेळू शकला नाही. यानंतर पाकिस्तानविरुद्ध तो फिट होऊन टीममध्ये परतला पण त्याला एकही रन करता आली नाही.
advertisement
5/6
अभिषेक शर्माचा हा पहिलाच टी-20 वर्ल्ड कप आहे आणि पहिल्या दोन्ही इनिंगमध्ये तो शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी आशिष नेहरा, इमरूल केस हे दोन्ही खेळाडू टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या दोन्ही सामन्यात शून्य रनवर आऊट झाले होते. नेहरा आणि केस यांनी त्यांच्या टी-20 वर्ल्ड कप करिअरमध्ये एकही रन केली नाही.
advertisement
6/6
मागच्या 6 टी-20 इनिंगमध्ये अभिषेक शर्मा हा 4 वेळा शून्य रनवर आऊट झाला आहे. 0, 68 नाबाद, 0, 30, 0 आणि 0 हे अभिषेक शर्माचे मागच्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमधले स्कोअर आहेत. टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघणाऱ्या टीम इंडियासाठी अभिषेक शर्माचं फॉर्ममध्ये येणं गरजेचं झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भरवसा ठेवला त्यानेच दगा दिला... टीम इंडियाच्या ओपनरचा नेहरापेक्षा वाईट विक्रम!